स्वच्छता विषयी पथनाट्य,राजिप शाळा वडगांव यांचा स्तुत्य उपक्रम
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
वडगाव : २२ सप्टेंबर,
स्वच्छता जेथे आरोग्य नांदे तेथे या पंक्तीच्या माध्यमातून,आपणांस खूप काही सांगून जाते.आज जिकडे तिकडे स्वच्छतांचे तीन तेरा वाजले असतांना यांचे महत्व पटवून देण्यांसाठी रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव येथे पथनाट्य समवेत स्वच्छता रॅली,स्वच्छता प्रतिज्ञा,स्वच्छता गीत, गायन,पथनाट्य, मानवी साखळी या द्वारे जनजागृती करण्यात आली.
स्वच्छतेचे किती महत्व असते यांचे आपणांस विविध ठिकाणी स्वच्छतेचे संदेश देणारे फलक आपण सातत्याने वाचत असतो.मात्र ते एखाद्या पथनाट्य स्वरुपात दाखविले की ते त्यांचे महत्त्व समजत असते, यावेळी कविता मोहन दहिफळे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.यावेळी त्यांनी स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे पटवून देत असतानाच आपल्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी गायना सह तज्ज्ञांचे स्वच्छता विषयी व्यख्यान देवून विद्यार्थामध्ये सकारात्मक भुमिका निर्माण केली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य,सर्व शिक्षक,स्वयंसेविका गाव स्वच्छता मोहीम राबविली या मध्ये सहभागी झाल्यांचे पहावयांस मिळाले.मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शना खाली वैजनाथ जाधव, उपक्रमाचे प्रमुख मयुरी धायगुडे यांनी नियोजन करून घोषवाक्ये, गीत,नाट्य इत्यादींचे आयोजन करण्यांत आले.यावेळी गावात रॅली काढून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
0 Comments