राष्ट्रवादी खालापूर तालुका उपाध्यक्ष विशाल म्हामूणकर, दोन्ही उमेदवार यांच्या विजयाचे शिलेदार ठरणार ?

 राष्ट्रवादी खालापूर तालुका उपाध्यक्ष विशाल म्हामूणकर,  दोन्ही उमेदवार यांच्या विजयाचे शिलेदार ठरणार ?


संतोष बैलमारे,प्रमिला महेश पाटील गेले अनेक दिवस प्रचारात त्यांचे मोलाचे योगदान 

माय मराठी न्यूज : वृत्तसेवा 
कुंभिवली : ४ फेब्रुवारी,



             कुंभिवली या गावातील तरुण तडफदार, संयमी, दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते म्हणजे राष्ट्रवादी खालापूर तालुका उपाध्यक्ष विशाल म्हामूणकर,सावरोली जिल्हा परिषद उमेदवार संतोष बैलमारे व पंचायत समिती सावरोली उमेदवार प्रमिला महेश पाटील हे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असताना,गेली अनेक दिवस त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात सक्रिय असून त्यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असून दोन्ही उमेदवार यांच्या विजयाचे ते शिलेदार ठरणार असल्याचे चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
           ग्रुप ग्राम पंचायत कुंभिवली येथे त्यांची पत्नी सदस्य म्हणून कार्यरत असतांना,मात्र विरोधक विकास कामाला अडथळा निर्माण करीत आहे हे निदर्शनास येताच,आपल्या गावाचा विकास व्हावा,या विचारातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये प्रवेश करून जनसामान्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सावरोली जिल्हा परिषद उमेदवार संतोष बैलमारे,यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे.या परिसरातील असलेल्या गावामध्ये उत्तम जनसंपर्क असून यांचा निश्वितच लाभ परिवर्तन विकास आघाडीला होणार आहे.यामुळे प्रमिला महेश पाटील,ह्या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उभी असून त्यांना जास्तीत जास्त मते कसे मिळतील यासाठी प्रयत्न सुरू आहे.
          कुंभीवली या परिसराचा विकास  होण्यासाठी सावरोली जिल्हा परिषद उमेदवार संतोष बैलमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या गावाला दहा लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.असे समजते ज्या व्यक्तीला गावाचा विकास करता येत नाही तो जनतेचा काय करणार? मात्र विकास स्वतःच्या स्वार्थासाठी तुंबड्या  भरणारे अनेक जण राजकारणात येत असतात मात्र समाजासाठी स्वतःला वाहून नेणारे अल्प च जण असतात. काही लोक राजकारणात स्वतःचा स्वार्थ पाहण्यासाठी येत असतो मात्र संतोष बैलमारे समाजामध्ये विकास कामाची गंगा, रोजगार, महिला वर्गांच्या हाताला काम, रोजगार हमी योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून तसेच गावाचा विकास करण्यासाठी सक्रिय असल्याचे बोलले जाते. यामुळे 7 फेब्रुवारी आपले अमूल्य मत त्यांना देऊन गुळाला त्यांच्या अंगावर पडल्याचे मला पहायचे आहे.असे मत विशाल म्हामूणकर यांनी माय  मराठी न्यूज शी बोलताना व्यक्त केले. 






Post a Comment

0 Comments

राष्ट्रवादी खालापूर तालुका उपाध्यक्ष विशाल म्हामूणकर,  दोन्ही उमेदवार यांच्या विजयाचे शिलेदार ठरणार ?