दुर्गम भागामध्ये आरोग्य तपासणी एटीजी हेल्थ केअर सामाजिक संस्थे चा पुढाकार
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
सकुचीवाडी : २३ सप्टेंबर,
दुर्गम आणी डोंगराळ भागात राहत असलेले ग्रामस्थ आजारी पडल्यांस आजही शेकडो मिटर पायी चालत जावे लागते.मात्र त्यांची शरिरिक प्रकृती उत्तम रहावी यासाठी एटीजी हेल्थ केअर सामाजिक संस्था पुढाकार घेत असून त्यांची आरोग्य तपासणी करण्यांत आली.विशेष म्हणजे साकुचीवाडी या गावामध्ये जावून ही आरोग्य तपासणी करण्यांत आली.यावेळी त्यांस लागणारे मेडीसिन मोफत देण्यांत आले.या उपक्रमास बिलियन हार्ट बिटटींग (अपोलो हॉस्पिटल ) यांचे सहकार्य लाभत आहे.
तालुक्याच्या ठिकाणी आजही परस्थिती गंभीर असून अन्न,वस्त्र,निवारा यांची सोय करतांना घरातील गृहस्थ त्याची तारांबळ उडत आहे.त्याच बरोबर दिवसेंदिव विविध आजर डोके वर काढत असतांना घरचे भागविणे कठिण जात असतांना एटीजी हेल्थ केअर सामाजिक संस्थे ही पुढाकार घेत असून सातत्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यांची काळजी घेत असल्यांचे पहावयांस मिळत आहे.
यावेळी या परिसरातील लहानांपासून ते वयोवृद्ध यांची आरोग्य तपासणी करण्यांत आली.विशेष म्हणजे डॉ.विश्वासराव गिरी आणी त्यांच्या अश्विनी गिरी यांचे मोलांचे सहकार्य लाभत आहे.यावेळी परेश सर,राठोड सर,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण सिद, रोहित पाटील अदि उपस्थित होते.
0 Comments