खालापुरात धनगर समाजाचे उद्या रस्ता रोको आंदोलन

 खालापुरात धनगर समाजाचे उद्या रस्ता रोको आंदोलन,

  मोठ्या संख्येने उपस्थित राहा - सकल धनगर समाजाचे आवाहन


पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे
खोपोली : २२ सप्टेंबर,

          सकल धनगर समाज खालापूर यांच्या वतीने सोमवार २३  सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, हे आंदोलन पेण  खोपोली रोड पाली फाटा येथे करण्यात येणार आहे. 
                धनगर समाजाला एसटी सर्टिफिकेट ) धनगर आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूर येथे समाज बांधवाच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे, सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले असून त्या उपोषनाला पाठींबा देऊन सरकारला धनगर समाजाची ताकद दाखविण्यांची वेळ आली असल्याने हे उपोषण करण्यात येणार आहे. 
           ना नेता ना पक्ष धनगर आरक्षण लक्ष हे ब्रीद वाक्य घेऊन सकल धनगर समाज यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात पक्ष संघटणा, गट तट, राजकीय मतभेत बाजूला ठेवून या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सकल धनगर समाज खालापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर