कर्जत खालापूर आमदारकीमध्ये पंचरगी लढत, बहुजन युथ पँथरचे किशोर साळुंके रिंगणात

 कर्जत खालापूर आमदारकीमध्ये पंचरगी लढत, बहुजन युथ पँथरचे किशोर साळुंके रिंगणात 



पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खोपोली : २७ ऑक्टोबर,

           कर्जत खालापूर मतदार संघातील आमदारकीची निवडणूक रंगतदार होत असून प्रथमतहा शिवसेना (उबाठा )व शिवसेना (शिंदे )अशी लढत होईल असे वाटत होते. परंतु आता अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या नंतर मनसे सुद्धा उमेदवार देत असताना चौरंगी लढत होईल असे समोर येताना अचानक बहुजन युथ पँथर या लढावय्या संघटनेने सुद्धा या मतदार संघात आपला उमेदवार उभा करण्याचे निश्चित केले असून बहुजन युथ पँथर चे खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
          मंगळवार,दि २९  रोजी उमेदवारी अर्ज सकाळी ११ वाजता प्रांत कार्यालय कर्जत येथे भरणार असल्याचे सुतोवाच जिल्हाध्यक्ष प्रवीण भाई रोकडे यांनी पत्रकारांना सांगितले.अन्यायाविरोधात बहुजन समाज जागा करणे आणि वंचितांना न्याय देणे यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांची आज या मतदार संघात गरज आहे. यासाठी आपलाच उमेदवार निवडून आणा आणि आपल्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी आपलाच नेता आणावा म्हणून मोठ्या संख्येने बहुजन कार्यकर्ते अर्ज दाखल करण्यास येणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष प्रविण भाई रोकडे यांनी पत्रकारांना सांगितले.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन