दिवाळीच्या सणानिमित्त एक कंदील,एक दिवा, मतदान कर रे भावा,राजिप शाळा वडगाव यांचा स्तुत्य उपक्रम

 दिवाळीच्या सणानिमित्त एक कंदील,एक दिवा, मतदान कर रे भावा,राजिप शाळा वडगाव यांचा स्तुत्य उपक्रम 


  स्विप कार्यक्रमांतर्गत वडगाव शाळेचे अभिनव मतदान जनजागृती




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
वडगाव : २६ ऑक्टोबर,

           रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असल्यामुळे या वर्षी दिवाळीच्या सणाच्या उत्सवात विधान सभेच्या निवडणूकीचे पडघम वाजत आहे.शासनांने मतदानांच्या दिवशी सार्वत्र सुट्टी जाहिर केली तरी काही नागरिक मतदान करीत नाही.मात्र लोकशाहीत मतदानाला खूप महत्व असून हे पटवून देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद वडगाव यांनी एक हजार शुभेच्छा कार्ड देवून या मध्ये मतदान करण्याविषयी आवाहन करण्यांत आले.


             

यावेळी विद्यार्थी गावामध्ये जावून शुभेच्छा कार्ड समवेत लोकशाहीचा व जागर, मतदानाचा हा कार्यक्रम हाती घेण्यांत आला.तसेच चला करू मतदान, मतदान या गीतावर नृत्य,पथनाट्य,तसेच मतदान जनजागृती चा संदेश देणारे आकाश कंदील,रांगोळ्या व मतदान करा असा संदेश देणारे गावामध्ये प्रत्येकास भेटकार्ड जनजागृती करण्यांत आली.या कार्यक्रमाचे आयोजन गटशिक्षणाधिकारी खालापूर - कैलास चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यांत आले.तसेच मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.


           यावेळी पनवेल तालुक्यातील ज्योती भोपी, म्हात्रे सर,मनोज म्हात्रे व योगिनी वैदू मॅडम यांनी या आई,या भाऊजी या मतदान करा  ही लावणी गात मतदारांना साद घातली.
------------चौकट --------
मुलांनी दिवाळी मतदान जनजागृती साठी हे उद्देश ठेऊन केलेले उपक्रम खरोखर स्तुत्य आहे 
महादेव गडगे : मा.सरपंच ( ग्रामस्थ )वडगाव 

   ------------चौकट ---------
वडगाव शाळा व शाळेचे सुभाष राठोड व सर्व शिक्षक नेहमीच वेगवेगळे यशस्वी उपक्रम राबवत असतात.१०००  शुभेच्छा कार्डाच्या माध्यमातून मतदान जनजागृती ही अभिनव संकल्पना सुंदर व कौतुकास्पद आहे  गटशिक्षणाधिकारी खालापूर - कैलास चोरमले,

----------चौकट ----------
मला नाविन्याची व नाविन्यतापूर्ण उपक्रम राबविण्याची आवड आहे,तसेच या कामासाठी विद्यार्थी,शिक्षक  पालकांचा पूर्ण सहभाग व पाठींबा असतो.
मुख्याध्यापक शाळा वडगाव - सुभाष राठोड,

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन