रस्ता, पाणी, वीजसह मूलभूत सुविधांसाठी,ऊंबरणेवाडी-खोंडावाडी ग्रामस्थांचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवेदन

 रस्ता, पाणी, वीजसह मूलभूत सुविधांसाठी,ऊंबरणेवाडी-खोंडावाडी ग्रामस्थांचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवेदन


माय मराठी न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर  : १६ जुलै,




             खालापूर तालुक्यातील ऊंबरणेवाडी ,खोंडावाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवेदन सादर करीत आपल्या व्यथा मांडल्या,रस्ता, पिण्याचे पाणी, वीज आणि शिक्षणाच्या सुविधांपासून वाडी आजही वंचित असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
           दोन दिवसांपूर्वी रस्ता नसल्यामुळे एका गर्भवती महिलेला कपड्याच्या झोळीतून उचलून पायी रुग्णालयात नेण्याची वेळ आली होती. या घटनेची वृत्तपत्रांनीही दखल घेतली होती. या घटनेनंतर प्रशासनास या ग्रामस्थांची व्यथा निदर्शनास आली. असल्याचे समजते.एकीकडे देश डिजिटल युगाकडे वाटचाल करत असताना, डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या या वाड्यांतील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे.वाडीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत आहे.या परिसरात वीज नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असून साप व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती कायम असते.
          ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची परिस्थितीही अत्यंत गंभीर असून जवळच मोरबे धरण असूनही ग्रामस्थांना नदीपात्रात खड्डे खोदून मिळणारे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.तसेच योग्य रस्ता व वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याचे प्रदीप उघडा,बबन वीर, अनंता पारधी, ललित उघडा, मंगल पोकला, वामन पिरकड,अनंता पारधी, राजु उघडा या यांनी निवेदनात नमूद करीत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments

 रस्ता, पाणी, वीजसह मूलभूत सुविधांसाठी,ऊंबरणेवाडी-खोंडावाडी ग्रामस्थांचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवेदन