कर्जत खालापूर मतदार संघातून किशोर साळुंके यांचा अर्ज दाखल, बहुजन युथ पँथरचा दे धक्का
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खोपोली : ३० ऑक्टोबर,
कर्जत विधानसभा मतदार संघातून विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी आजच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरले असून महाराष्ट्रात आक्रमक संघर्ष करणारी संघटना म्हणून नाव असणाऱ्या बहुजन युथ पँथर च्या वतीने किशोर साळुंके यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला.
खोपोली खालापूर मतदार संघात मोठ्या घडामोडी घडत असतानाच महायुती असो अथवा महाआघाडी यांच्यात सरळ लढत वाटत असतानाच दोन्हीही गटबंधनात काही प्रमाणात नाराजीचे सुर दिसत असताना फुटाफूट होऊन एक मेकांना घेऊन लढणे असताना काही जण एक मेकांच्या विरोधात लढत आहेत.
बहुजन युथ पँथर च्या वतीने आज किशोर साळुंके यांनी अर्ज भरल्याने या मतदार संघातील अनेक प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावण्यास मदत होईल व बहुजन,पीडित, वंचित समाजासाठी न्यान मिळेल असे प्रतिपादन बहुजन युथ पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांनी व्यक्त केले.जिल्हाध्यक्ष प्रवीण रोकडे यांनी आपले मत व्यक्त करताना पत्रकारांना सांगितले कि, कर्जत खालापूर मधील सर्व बहुजन समाज किशोर साळुंके विजयी होतील.
0 Comments