कृष्णा भोईर यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित - सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव
माय मराठी न्युज : राज साळुंखे
खोपोली : १० जानेवारी
शिक्षक हा कोणत्याही अपेक्षेने नव्हे तर आत्मप्रेरित होऊन या शिक्षक पेशात उतरलेला असल्याने त्याच्या जगण्याचा केंद्रबिंदू हा नेहमी विद्यार्थी असतो. आपण एक समाजाची पिढी घडवत असल्याची जाणीव नेहमी शिक्षकाला असल्याने असंख्य शिक्षक वर्ग आपल्या शैक्षणिक बुद्धीच्या जोरावर विद्यार्थ्यांना घडवत असताना शिक्षक वर्ग वेगवेगळी कार्यपद्धती अवलंब विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करीत असल्याने समाजात चांगली पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचा समाजात विविध स्तरावर सन्मान करण्यात येत असतो. 35 वर्ष रायगड जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करणाऱ्या कृष्णा भोईर यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ तालुका पेण यांच्या वतीने सन्मानित करण्यात आल्याने कृष्णा भोईर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव असून हा पुरस्कार भोईर यांना मा.अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद निलिमाताई धैर्यशील पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अखिल भारतीय शिक्षक संघ वर्धापन दिनाचे औचित्य साधत आगरी समाज विकास मंच हॉल चिंचपाडा पेण भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध उपक्रम पार पडले असता या सोहळ्यात गुणवंत शिक्षक पुरस्काराने शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. या सन्मानात गेली ३५ वर्ष शिक्षक सेवेत निस्वार्थीपणे काम करणारे रा.जि.शाळा शिर्की, चाळ नंबर २ येथील शिक्षक कृष्णा भोईर यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावेळी खासदार धैर्यशीलदादा पाटील, मा. कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार रवी पाटील, मा. अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद निलिमाताई धैर्यशील पाटील, रा.जि.प.उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे, मा. सदस्य शिक्षण समिती रा.जि.प.प्रभाकर म्हात्रे, मा. नगरसेवक शोरेमभाई पेणकर, पंचायत समिती पेण गट शिक्षणाधिकारी अरुणादेवी मोरे, अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघ तथा कोकण विभाग अध्यक्ष प्रमोद पाटील आदी प्रमुखांसह अखिल भारतीय शिक्षक संघाचे जिल्हा, तालुका व केंद्र कार्यकारणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------चौकट ------------
एक उत्तम विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांचे काम आहे. विद्यार्थ्याचे उज्ज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती आहे. कोणतीही अपेक्षा न करता विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहिल्यास समाजात चांगली पिढी निर्माण होईल, यातून शिक्षक म्हणून आपल्याला वेगळेच समाधान मिळते. तर देशाची नवी पिढी घडत असताना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने हा पुरस्कार मला पुढील अधिक बळ देणार आहे.
कृष्णा भोईर - शिक्षक
0 Comments