संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर

 संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर,मा.आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते होणार प्रधान 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
सारसई : २८ ऑगस्ट,

       सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा निर्माण करुन सारसई या गावाला ज्यांच्या नावांने ओळखले जाते ते सर्वांच्या परिचयाचे असलेले व्यक्तीमत्व म्हणजे संतोष शिंगाडे यांना नुकताच महाराणी अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्र रत्न या पुरस्कारांने सन्मानित करण्यांत आले त्यातच एक अजून एक पुरस्कारांची भर पडली असून आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार,प्रदान करण्यांत येणार असल्यांचे समजते ह्या बँकेचे अध्यक्ष मा.आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते शनिवार ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता बँकेच्या केंद्र कार्यालय अलिबाग येथे होणार आहे.
           

          संतोष शिंगाडे गेले अनेक वर्ष ग्रामीण भागातील वंचित वाड्या वस्त्यांच्या विकासाठी सातत्याने अग्रेसर असून गेली १५ वर्ष समाज कार्यासाठी स्वताला झोकून दिले.विविध सेवाभावी संस्था यांच्याशी संपर्क करून ५०० हुन अधिक ग्रामीण व दुर्गम भागातील मुलांना शाळेच्या शैक्षणिक प्रवाहत आण्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करुन त्यांनी उल्लेखनिय कामगिरी केली.त्याच बरोबर गावाच्या विकासाठी ते सातत्यांने सकारात्मक भूमिका घेत असून त्यांच्यामुळे या परिसराचा विकास होत असल्यांचे बोलले जाते कोणतेही पद नसतांना एक उत्तुंग भरारी घेत विकास कामे केली.
               समाजसेवा करण्यांसाठी मानसिकता असणे गरजेचे आहे.आपल्या जवळ असलेले ज्ञान आणी बुद्धीमतेचा वापर करुन समाज्यासाठी उपयोगात यावे यासाठी त्यांनी स्वताला झोकून देवून दिले.रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ने नुकताच ६५०० कोटींचा व्यवसायिक टप्पा पार केला असून,तसेच राज्यातील सहकार क्षेत्रातील सर्वोच्च 'सहकार महर्षी' पुरस्काराने बँकला  सन्मानित केले.आश्या बॅंकच्या माध्यमातून मिळालेला पुरस्कार म्हणजे त्यांनी केलेली समाज कार्याची घेतलेली दखल असे बोलले जात आहे. 

                


Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर