स्व.प्रभावती कळमकर यांच्या स्मृिदिनानिमित्त सी.सी. टिव्ही कॅमेरा भेट.
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : १० जानेवारी,
स्वर्गीय प्रभावती मधुकर कळमकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त दिलासा फाउंडेशन आणि रायगड मावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज कळमकर यांनी खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा सुपूर्द केला.
खालापूर शहर तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी दररोज शेकडो नागरिक कामानिमित्ताने येत असतात.खालापूर बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने या ठिकाणी मद्यपी, टवाळखोर यांचा मुक्त वावर होता.सकाळी महाविद्यालय जाणाऱ्या विद्यार्थिनींना तसेच रात्री उशिरा कामावरून सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या महिलांना बस स्थानकात असुरक्षित वाटत असल्याने प्रवासी तसेच बस स्थानकातील व्यापाऱ्यानी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा अशी मागणी केली होती.
सामाजिक उत्तरदायित्व या भावनेतून कळमकर कुटुंबानी त्यांच्या मातोश्रींच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने सीसीटीव्ही कॅमेरा भेट दिला असून कॅमेरा बस स्थानकात बसविण्यात देखील आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरा खालापूर पोलीस ठाण्यात सुपूर्त करतेवेळी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक विधी महाविद्यालयाचे अध्यक्ष नरेंद्र शहा, नगराध्यक्षा रोशना मोडवे, ज्येष्ठ पत्रकार विकी भालेराव, प्रसाद अटक, दीपक जगताप , सपोनी प्रकाश वाढवे, सामाजिक कार्यकर्ते संतोष खालापूरकर,सचिन पारठे,गणेश सांळुखे, मोहन दिनकर,निवास चौधरी ,मनोज कळमकर उपस्थित होते
0 Comments