घोटावडे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी वासंती घुटे बिनविरोध....

 घोटावडे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी वासंती घुटे बिनविरोध....



माय मराठी न्युज : ११ जानेवारी 
खोपोली : दत्तात्रय शेडगे 

           घोटावडे ग्राम पंचायतच्या उपसरपंच पदी वासंती दत्ता घुटे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे, 
 सुधागड तालुक्यातील अतिशय प्रतिष्टेची असलेल्या घोटावडे ग्रामपंचायतचे उपसरपंच विष्णू दाया डुमणा यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली होती.यावेळी उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्या वासंती दत्ता घुटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची घोटावडे ग्रामपंचायतच्या उपसरपंच बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले,
           यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच पांडुरंग भगवान झोरे तर सहाय्यक  म्हणून ग्रामसेवक सुनील पानसरे  यांनी काम पाहिले, नवनिर्वाचित उपसरपंच पदी वासंती घुटे यांची निवड होताच सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत, 
          यावेळी  सरपंच पांडुरंग भगवान झोरे, माजी सभापती  पीडी डूमणा, पुष्पा डुमणा, सदस्य मोरेश्वर वाघमारे, विष्णू डुमणा, सदस्या ताराबाई जगताप, माजी सरपंच यमा डुमणा, बबन झोरे, ताई वारे, ओंकार हिंदोळे  सुक्र्या घुटे आदि उपस्थिती होते,

Post a Comment

0 Comments

ज्योतिष,वास्तु राष्ट्रीय महा अधिवेशनात महेश निमणे यांस वास्तुश्री पुरस्कारांने सन्मानित