राजिप शाळा वडगांव येथिल विद्यार्थ्यांना,मल्हार ट्रेकिंग ग्रुपकडून शैक्षणिक साहित्य वाटप

 राजिप शाळा वडगांव येथिल विद्यार्थ्यांना,मल्हार ट्रेकिंग ग्रुपकडून शैक्षणिक साहित्य वाटप 





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वडगांव : ३ सप्टेंबर


            रायगड जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची स्थिती उत्तमच असते असे नाही.मात्र आजही या समाज्यामध्ये असे काही संस्था आहेत की ते विद्यार्थ्यांना मदत करीत असतात.यामुळे पालकांच्या खिशाला बसणारी झळ कोठेतरी कमी होत असल्यांचे पहावयास मिळत आहे. यामुळे रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव येथिल शालेय शिक्षण घेत असलेल्या पहीली ते सातवीच्या  विद्यार्थ्यांना मल्हार ट्रेकिंग ग्रुपकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच आनंद पहावयास मिळाले.
                  कल्याण येथील मल्हार ट्रेकिंग ग्रुप च्या वतीने डॉ.अजित मेहर व प्रणय बांदवकर उपस्थितीत वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी वाशिवली येथिल शिवाजी देशमुख सचिन पाटील,यांनी सहकार्य केले.यावेळी इतर मंडळाचे सदस्य उपस्थित होते.यावेळी डॉ. मेहर यांनी त्यांच्या बालपणी च्या स्थितीविषयी सांगताना भावुक झाले व मुलांना या साहित्याचे महत्त्व काय आहे हे ओळखा अभ्यास करा खुप शिका असे मार्गदर्शन करण्यात आले.
               

यावेळी उपस्थितमान्यवरांच्या हस्ते  विद्यार्थ्यांना शाळेय साहित्य वाटप करतांना अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.मुलांनी खूप शिकून अकाशाला गवसणी घाला.कारण शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.यामुळे विद्यार्थ्यांनी आत्मसात केले.यावेळी मल्हार ट्रेकिंग ग्रुप चे डॉ.मेहर,प्रणय बांदवकर,सचिन पाटील, शिवाजी देशमुख व शिक्षक वैजनाथ जाधव,स्वयं सेविका निकिता गडगे,साक्षी जांभुळकर व विद्यार्थी उपस्थित होते.



कोट 
          एक वही व लेखणी याची ताकद  खूप मोठी आहे , आज आपल्याला मल्हार ट्रेकिंग च्या माध्यमातून बळ देण्याचे काम केले आहे.याचा मुलांनी योग्य फायदा घेऊन खूप अभ्यास करावा.वह्यांची किंमत  माफक असते पण त्या पाठीमागची भावना व उद्देश यांचे मोल अनमोल असते. वडगांव  मुख्याध्यापक- सुभाष राठोड 

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन