खालापुरात भाजप कार्यकर्त्यांनी बारणेंच्या प्रचाराकडे फिरवली पाठ ?

 खालापुरात भाजप कार्यकर्त्यांनी बारणेंच्या प्रचाराकडे फिरवली पाठ ?



पाताळगंगा न्युज : समाधान दिसले
खालापूर : १२ एप्रिल,

                सर्वत्र ठिकाणी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मावळ लोकसभा मतदारसंघातही या रणधुमाळी चा रणसंग्राम सुरू झाला असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मित्र पक्षाकडून प्रचारात आघाडी घेतली असून संजोग वाघेरे यांनीही मतदारांच्या गाठीभेटी घेईल, हुकूमशाही हद्दपार करण्यासाठी मशाल चिन्हावर बटन दाबून इंडिया आघाडीच्या उमेदवाराला विजय करा असे आव्हान केले असून संजीव वाघेरे यांच्या प्रचारात सर्वच मित्र पक्षांनी मोठी मोर्चे बांधणी केल्याचे पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे विरोधी शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याकडे त्यांच्याच मित्र पक्षातील खालापुर मधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्याने भाजपची बारणेंवरील नाराजी दिसून येत आहे.
         गेल्या दहा वर्षात खालापुरात भाजप कार्यकर्त्यांना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मिळालेली दुजाभावाची वागणूक व काम करण्याच्या पद्धतीत असलेला दिरंगाईपणा यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये बारणेबाबत नाराजी आहे.तर बारणे फक्त निवडून येण्यापुरतेच आम्हाला विचारात घेतात, अशी कुजबूज खालापूर मधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये ऐकावयास मिळत आहे. दोन वेळा बारणेचे आम्ही मनापासून काम केले, परंतु निवडून आल्यानंतर बारणेंनी आमची कोणतीही कामे न करता फक्त आमचा मतांसाठीच वापर केलाय, पुढेही बारणे निवडून आले तर ५ वर्षे दिसणार नाहीत. त्यामुळे खालापूर भाजप चे कार्यकर्ते बारणे पासून दूर राहणे पसंत करत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
        एकीकडे अब की बार ४००  पार अशी भाजपची टॅग लाईन असताना मावळ लोकसभेतील खालापूर तालुक्यात बारणें बाबत भाजप कार्यकर्ते अनुकूल नसल्याची स्थिती पहावयास मिळत आहे. तर बारणेंच्या प्रचारार्थ मींदे गटाच्या मित्र पक्षातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बारणेची गाठीभेटी घेतल्या मात्र भाजपाने त्यांच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवत नाराजीचा सूर आळवल्याचे दिसत आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर