यजमानपद आपल्याकडे असल्याने आ. पल्याला जोमाने कामास लागले पाहिजे-आ महेंद्र थोरवे

 यजमानपद आपल्याकडे असल्याने आपल्याला जोमाने कामास लागले पाहिजे-आ.महेंद्र थोरवे




पाताळगंगा न्युज : दिनेश पाटील
साजगाव : १२ एप्रिल,
           
            लोकसभेला मावळ मतदार संघात आपल्याला यजमानपद मिळाल आहे.यावेळी महायुतीतुन शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे उमेदवार असल्याने त्यांना निवडून आणण्यासाठी आपल्याला अधिक जोमाने काम करणे गरजेचे आहे असे गौर उदगार कर्जत खालापूरचे आ. महेंद्र थोरवे यांनी साजगाव पंचायत समिती आढावा बैठकीच्या काढले.
              लोकसभेची निवडणूक तोंडावर आली. असल्याने शिवसेनेकडून जोरदार तयारी खालापूर तालुक्यात सुरु करण्यात आली. असून प्रत्येक पंचायत समिती विभागात कर्जत खालापूरचे आ.महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठका घेण्यास सुरुवात केल्याने प्रचारात सेना एक पाऊल पुढे टाकून मुसंडी मारत असल्याचे दिसत आहे. नुकताच साजगाव पंचायत समिती विभागाची आढावा बैठक साजगाव फाटा येथील एन.पी.ढाबा येथील सभागृहात पार पडली.
                  निवडणूकीच्या प्राश्वभूमीवर ही बैठक असल्याने कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती तर साजगाव पंचायत समिती विभागातील सर्व नेते ही हजर होते.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना आ.महेंद्र थोरवे यांनी,यावेळी महायुतीने  मावळ मतदार संघासाठी दिलेला उमेदवार हा शिवसेनेचा आहे.त्यामुळे यजमानपद आपल्याकडे असल्याने येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकी पर्यंत आपल्याला महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे काम जोमाने करायचे आहे आणि मोठ्या मताधिक्क्याने निवडूनही आणायचे आहे.
               प्रत्येक पंचायत समिती विभागात नियोजनपूर्ण काम करून मतदारांना गेल्या पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाबद्दल माहित द्यायची आहे.आपल्या या मतदार संघात आतापर्यंत नवशे कोटिहून अधिक विकासनिधी आणला आहे.आणि त्यामुळे प्रत्येक गावात विकासाची गंगा वाहत असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आपण यशस्वी झालो आहोत.असे असताना युवकांना रोजगार आणि व्यवसाय मिळवून दिल्याने युवकांचे हात आता मजबूत झाले आहेत त्यामुळे मतदार राजा आपल्याला आपन केलेल्या कार्याची पोचपावती नक्कीच देईल म्हणून आपण आता जोमाने कामास लागायला पाहिजे आणि मावळ लोकसभा मतदार संघात जास्तीत जास्त मताधिक्य देत पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांना आपल नेतृत्व बनवून खासदार बनवायच आहे असे यावेळी विचार मांडले.तर जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी कसे नियोजन करून काम करायचे याबद्दल माहिती दिली.यावेळी विविध पदनियुक्त्याही करण्यात आल्या.
            सदर आढावा बैठकीला खालापूर प्रचार प्रमुख संतोष विचारे,युवासेना तालुका अधिकारी रोहित विचारे,जनार्धण थोरवे,वालचंद ओसवाळ,उपतालुका प्रमुख प्रवीण पाटील,आत्कारगाव ग्रामपांचायतीचे उपसरपंच गणेश पाटील,शशिकांत देशमुख,संतोष मुंढे,शिवाजी पाटील,शिवउद्योगचे उपतालुका प्रमुख संतोष कदम यांसह मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होत.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण