चावणीचे सरपंच बाळासाहेब आखाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश,शेकापसह राष्ट्रवादीला (अजित पवार गट) जोरदार धक्का
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खालापूर : १० डिसेंबर,
खालापूर तालुक्यातील प्रतिष्टीत असलेल्या चावणी ग्रामपंचायत थेट सरपंच पदी निवडून आलेले शेकाप राष्ट्रवादीचे बाळासाहेब आखाडे यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना( शिंदे गटात ) जाहीर प्रवेश केला.
चावणी ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक गेल्या वर्षी झाली या निवडणुकीत थेट सरपंच पदी शेकाप राष्ट्रवादी कडून बाळासाहेब आखाडे हे निवडून आले होते, शिवसेनेच्या वतीने नवनियुक्त सरपंच उपसरपंच आणि आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार सोहळा कर्जत येथे आयोजित करण्यात आला होता , यावेळी खासदार श्रीरंग बारणे ,आमदार महेंद्र थोरवे, यांच्या नेतृत्वाखाली आज सरपंच बाळासाहेब आखाडे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला,
चावणीचे सदस्य रमेश चव्हाण, माजी सरपंच ताई आखाडे, माजी उपसरपंच गणेश चव्हाण,गणेश आखाडे, बाबू शेडगे, मारुती शेडगे, मारुती डफाळ, लक्ष्मण बुधलेकर, कांता उतेकर, मारुती लगड, नितीन पाताडे, राम पाटील, देवराम मुठल, राहुल पाटील, प्रदीप भवूड, दीपक नांदूष्कर,प्रकाश भवूड, अनंता घोलप, रघुनाथ जाधव, कैलास भवूड, धनराज डफाळ, चेतन उतेकर , सुरेश शेडगे, संतोष शेडगे, गणेश बावदाणे बाळू आखाडे, दर्शन आखाडे, अक्षय आखाडे प्रवीण आखाडे, प्रकाश जानकर, आदींसह अनेक महिलांनी जाहीर प्रवेश केला,
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाप्रमुख संतोष भोईर, शिवसेना नेते विजय पाटील, उत्तम प्रबलकर, मनोहर थोरवे,खालापुर तालुका प्रमुख संदेश पाटील, आदींसह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments