सेंट मेरी स्कुल खरसुंडी फी वाढिव संदर्भात सजोग वाघिरे पाटील यांस निवेदन
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खरसुंडी : ३ एप्रिल,
खालापूर तालुक्यातील खरसुंडी गावानजिक असलेली सेंट मेरी (इंग्लीश मेडीयम स्कुल,)येथे नर्सरी ते आठवी पर्यंत वर भरत आहे. मात्र अचानक फी वाढीव झाल्यामुळे पालक वर्ग संताप व्यक्त करीत आहे.सुरुवातीच्या काळात अल्प प्रमाणात फी वाढेल असे शाळा व्यवस्थापक यांच्या कडून सांगण्यात येत होते.मात्र शाळेची इमारत पुर्ण झाल्यानंतर ३५ ते ४० टक्के वाढिव फी साठी पालक वर्गांस धारेवर धरण्यांत आले.मात्र यांस कोठेतरी लगाम लागावा या उद्दात विचारांतून लोकसभेच्या मावळ मधून उभे असलेले उमेद्वार सजोग वाघेरे पाटील यांस निवेदन देण्यांत आले.यावेळी आपण व्यवस्थापक यांस जाब विचारुन नक्कीच मार्ग काढू असे निवेदन देत असलेल्या पालकांना म्हणाले.
विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने पालकांनी आपल्या मुलांना या शाळेमध्ये दाखल केले.विशेष म्हणजे ही शाळा सीबीसी बोर्ड असल्यांचे सांगण्यांत आले मात्र अजुनही या शाळेला मान्यता मिळाली नसल्यांचे पालकांचे मत आहे.त्याच बरोबर शाळा व्यवस्थापक आमच्या कडे सर्व मान्यता असल्यांचे सांगत असून मात्र पालकांना कोणतेही पत्र दाखविण्यांत आले नाही.किंवा स्टेट बोर्ड ची सुद्धा मान्यता नसल्यांचे पालकांचे मत आहे.यासाठी सातत्याने पालक वर्ग मिटिंग घेवून आपला निषेध व्यक्त करीत आहे.
एप्रिल महिन्यात शाळा सुरु झाली असून पालक वर्गांनी फी वाढीवमुळे आपल्या मुलांना शाळेत न पाठविण्यांचा निर्णय घेतला आहे.तसेच कोणत्याही प्रकारची पुस्तके अजुनही विद्यार्थ्यांनी घेतली नाही.जो पर्यंत वाढलेले फी कमी होत नाही, तो पर्यंत आमची मुळे शाळेत न पाठविण्यांचा पवित्रा येथिल पालक वर्गांनी घेतला आहे.ही शाळा ग्रामीण भागत असून पालकांचे उत्पन्न अल्प असल्यामुळे शाळेय व्यवस्थापक यांनी विचार करुन या माध्यमातून मार्ग काढावा असे पालकांचे मत आहे.शिवाय पीटीए मेंबर यांस विश्वासात न घेता वाजवी पेक्षा फी वाढत असल्यांचे मत पालकांनी व्यक्त केले.
0 Comments