गेट टुगेदर च्या निमित्त्ताने विद्यार्थ्यांचा वृक्ष लागवड ,श्री छत्रपती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज वावोशी या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम,

 गेट टुगेदर च्या निमित्त्ताने विद्यार्थ्यांचा वृक्ष लागवड ,श्री छत्रपती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज वावोशी या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम,



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
वावोशी : ७ जुलै,

                    सन २००५ मध्ये श्री छत्रपती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज वावोशी या शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी १९ वर्षांनी एकत्र आले.मात्र यावेळी सर्व विद्यार्थी मित्रांनी आपटी तसेच शेडशी या वन विभागाच्या जागेमध्ये ७० ते ८० वृक्ष लागवड केली.आपल्या भेटीची आठवण सातत्याने स्मरणार्थ रहावी या उद्दात विचारांतून हा उपक्रम  हाती घेण्यांत आला. 
               आपण ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत असतांना, दहावी नंतर सर्व मित्र  दुरावले होते.मात्र सोशल मिडियांच्या माध्यमातून एकत्र ऐउन, त्यांनी उत्तम असा उपक्रम हाती घेतला.वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन करण्यांची जबाबदारी या  विद्यार्थ्यांनी घेतली. आपण या पावसाळ्यांत एकत्र आले असतांना कोणताही धबधबे या ठिकाणी जावून यांचा आनंद न घेता वृक्ष लागवडीचा आनंद घेतला.
              दहावीच्या बॅचचे सर्व विद्यार्थी यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतल्यांने त्यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.मिळालेल्या वेळेचे सोनं करावे यांच विचारंतून वृक्ष लागवड करुन पर्यावरणांचा समतोल अबाधित ठेवू, या लागवड केलेल्या वृक्षांची भविष्यात नक्कीच मदत होइल,आज विविध कारणास्तव वृक्ष तोड केली जाते.यामुळे समतोल ढासळत चालला आहे,या जिव सृष्टीतील प्रत्येकांस शुद्धा हवा हवी आहे. ती तुटी भरुन काढावी या विचारांतून या सर्व विद्यार्थ्यांनी निसर्गाचं काहीतरी देणं आहे.हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून,हा ग्रुप एकत्र ऐउन हा वृक्ष लागवड आणी त्यांचे संवर्धन करण्यांचा  कार्यक्रम हाती घेतला. 

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण