दहा दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप, चिमुकल्यांना अश्रू अनावर

 दहा दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप, चिमुकल्यांना  अश्रू अनावर 





पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
तळवली  : १७  सप्टेंबर 

                
           दीड आणी पाच  दिवसाच्या  गणपती विसर्जन झाल्यानंतर आज अनंत चतुर्दशी चे गणतीचे विसर्जन होणार यामुळे सार्वजनिक मंडळे आणी घरघुती मंडळाची जयत तयारी सुरु होती पावसाचे अगमन केव्हा होईल यांची शास्वती नव्हती मात्र दहा दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल तासे सज्य झाले होते. काही सार्वजनिक मंडळाने महिनाभर अधिच ढोल ताशे बुक केले होते.यामुळे भक्तांचा उत्साह ओसांडून वाहत होते.
                  अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठीक - ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते. गणपती विसर्जनाची तयारी सुरु होती.कारण पाऊस केव्हा येईल यांची शास्वती नव्हती यामुळे विविध ठिकाणी गणपती विसर्जनासाठी लहान मुले ते वृद्ध या ठिकाणी एकत्र आले होते. मिरवणुकीत लहान मुले ढोल ताश्यांच्या ढेक्यावर नाचण्यांत तल्लीन झाली असल्यांचे पहावयांस मिळाले. 
                  गणपती विसर्जनास  टाळ-मृदुंगांच्या तालावर भजन म्हणत गणरायाला निरोप देण्यात आला.विसर्जन करण्यापुर्वी महाआरती करुन विसर्जन करण्यांत आले 

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण