दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचा स्तुत्य उपक्रम



पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खालापूर : १५ सप्टेंबर,

              सातारा जिल्हातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळा मालदेव ठोसेघर येथील विद्यार्थ्यांना  ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने शैक्षणिक साहित्य करून विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा दिला आहे.
             ऑल इंडिया धनगर समाज महासंघ हा महाराष्ट्रातील अनेक दुर्गम भागात पोहचून गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून एक हात मदतीचा देत असतो.ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर हा महासंघ काम करत असून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन समाजात शिक्षणाची क्रांती घडावी या उद्देशाने काम करत आहेत,
         याच उद्देशाने त्यांनी सातारा जिल्हातील दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळा मालदेव (ठोसेघर) येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले तर शाळेच्या मोडलेल्या दोन खिडक्यासाठी मालदेव ग्रामस्थांनी शाळेला आर्थिक मदत केली यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, रायगड जिल्हा प्रभारी अध्यक्ष आनंदराव कचरे,माजी पंचायत समिती सदस्य शंकर चव्हाण, मालदेव ग्रामपंचायतचे सरपंच चव्हाण, उपसरपंच जयराम चव्हाण, शंकर बेडेकर, नामदेव आवकीरकर शिक्षक जाधव, काटवणे, ग्रामपंचायत सदस्य कोंडीबा पांढरमिसे,सामाजिक कार्यकर्ते आनंद खरात, रामचंद्र खरात, बाबुराव खरात, शंकर शेडगे, लक्ष्मण खरात, विठ्ठल खरात, संतोष खरात लक्ष्मण मेळाट, विठ्ठल मेळाट, आदिसह अनेक ग्रामस्थांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण