इमॅजिका च्या कामगारांनी स्विकारले,वर्ल्ड एंटरटेनमेंटमध्ये स्वराज्य कामगार युनियनचे नेतृत्व

 इमॅजिका  च्या कामगारांनी स्विकारले,वर्ल्ड एंटरटेनमेंटमध्ये स्वराज्य कामगार युनियनचे नेतृत्व, माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या हस्ते नामफलकांचे अनावरण 




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खालापूऱ : ५ मार्च,


            खालापूर तालुक्यातील जागतिक लेव्हलचे असलेले थिमपर्क इमॅजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट युनिटमध्ये  भाजपा प्रणित स्वराज्य कामगार युनियनच्या नेतृत्व स्विकारुले असून या नामफलकाचे अनावरण मा.आ. सुरेश लाड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी सुरक्षा रक्षकांच्या चेहऱ्यावर आज वेगळाच उत्साह दिसत होता.
              जागतिक लेव्हलला असलेल थीमपार्क खालापूर तालुक्यात कित्येक वर्ष मिरकुटवाडी येथे आहे.या ठिकाणी देशभरातून हजारोच्या संखेने पर्यटक आपली हौस पूर्ण करण्यासाठी येत असतात. यांना सर्व सुविधा देण्यासाठी शेकडोच्या संख्येने कामगार वर्ग येथे काम करीत आहेत.दिवसरात्र काम करीत असताना मात्र योग्य तो मोबदला मिळत नसल्याने हताश झालेल्या कामगारांनी स्वराज्य कामगार युनियनचे नेतृत्व स्विकारले.
           यावेळी सनी यादव, उपाध्यक्ष प्रसाद पाटील यांची भेट घेत आपली होणारी घुसमट त्यांच्यासमोर मांडळी असता याच कामगारांना न्याय देण्यासाठी इमॅजिका वर्ल्ड इंटरटेनमेंट मध्ये युनियन लावण्यात आली. यावेळी  जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील,विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
           यावेळी आपले विचार मांडताना,इमॅजिका थीमपार्क बंद नहोता सुरु राहणे गरजेचे आहे कारण येथील कामगार, बाहेरील व्यावसायिक यांचेही घर चालत असत.त्यामुळे शक्यतो आपण सर्व गोष्टी या चर्चेतून सोडवाव्यात ज्यामुळे कोणतेही वाद होणार नाही मात्र माझ्या कामगार बंधू आणि भगिनीला योग्य तो मोबदला मिळाला नाही तसेच आमच्या मालकाची किती ओळख आहे तसेच किती मोठे संबंध आहेत याची धमकी आम्हाला देऊ नका. कारण ओळख आणि हात वर आहेत मात्र ही कंपनी आपल्या परिसरातिल जागेवर आहे हेही कंपनीने लक्षात ठेवा.
                तसेच सनी यादव आणि प्रसाद पाटील आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत तुमच्यावर कोणत्याही प्रकारे दबावतंत्र येत असेल तर घाबरू नका असे वक्तव्य माजी आ सुरेश लाड यांनी केले.कोणत्याही हुकूमशाहीला न जुमानता इमॅजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट येथे कामगारांना न्याय मिळावा ह्या उद्देशाने स्वराज्य युनियन ची स्थापना केली आहे. या कामगिरी बद्दल सनी यादव व प्रसाद पाटील यांच उपस्थितानी कौतुक करत आम्ही नेहमीच तुमच्या सोबत राहू असे आश्वासन दिले.
           यावेळी कर्जत खालापूर निवडणूक प्रमुख भाजपा किरण ठाकरे, जिल्हा सरचिटणीस भाजपा दिपक बेहरे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, प्रल्हाद केणी खालापूर संपर्क प्रमुख भाजपा,मिलिंद भोईर स्वराज्य कामगार युनियन अध्यक्ष,नरेश पाटील, संदीप पाटील, रवींद्र पाटील, जगदीश आगीवले,नागेश पाटील,दिपक जगताप खालापूर शहर अध्यक्ष भाजपा,डॉ निकेत पाटील, भरत महाडिक ,प्रसाद देशमुख, मयूर पाटील,मुनीर धनसे, विकास रसाळ, संजय देशमुख यांच्यासह आदी पदाधिकारी  व युनियन अध्यक्ष जयेश पालांडे, राजेंद्र सावंत, नितीन सावंत, फैजान कलबसकर, आशिष धनवी, अनिल बोंबे, प्रतीक नलावडे, दिपक आंग्रे, रोशन पाटील, भावेश निगुडकर, अनिल राणे, चैत्यन्य ओव्हाळ, प्रसाद पिंगळे यांच्या सह कामगार वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर