खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण

 खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : १७ सप्टेंबर,

              तहसीलदार पदाचा नुकताच कार्यभार स्वीकारलेले अभय चव्हाण यांच्या हस्ते कोरोना योद्धा  सहाय्यक फौजदार कै. महेश मधुकर कळमकर उद्यानात तहसीलदार अभय चव्हाण नव्याने खालापूरला रुजू झाले असून औषधी बहुगुणी असे चिंच वृक्ष भेट देऊन लागवड करण्यात आली.
           दिलासा फाउंडेशन खालापूर आणि रायगड मावळ पत्रकार संघाचा  ३६५ दिवस वृक्ष असा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत खालापूर परिसरात विविध बहुगुणी औषधी वृक्षांची लागवड व जोपासना करण्यात येत आहे.तालुक्याच्या ठिकाणी नव्याने आलेले प्रशासकीय अधिकाऱ्यांचे स्वागत वृक्ष देऊन तसेच वृक्ष लागवड करून देण्याची प्रथा दिलासा फाउंडेशनने सुरू केली आहे. 
           यावेळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, विकास पवार, दिलासा फाऊंडेशन आणि रायगड मावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज कळमकर, पत्रकार दीपक जगताप, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गावडे उपस्थित होते. खालापूर शहराची प्रचंड अशी वृक्ष संपदा रस्ता रुंदीकरणात नष्ट झाली आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून एक्सप्रेस हायवे ला जोड रस्ता देताना,जवळपास दीडशे पेक्षा जास्त जुने वृक्ष तोडण्यात आले. खालापूरची वनसंपदेचे गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी दिलासा फाउंडेशन व पत्रकार मित्र यांनी वृक्ष लागवड उपक्रम सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर