सारसई धनगर वाड्याची स्मशानभूमीची दुरावस्था, पत्रे नसल्याने ग्रामस्थांना करावे लागणार उघड्यावर अंत्यसंस्कार , ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

सारसई धनगर वाड्याची   स्मशानभूमीची दुरावस्था, पत्रे नसल्याने ग्रामस्थांना  करावे लागणार उघड्यावर अंत्यसंस्कार , ग्रामपंचायतचे दुर्लक्ष



राम ढेबे (पाताळगंगा न्यूज )
आपटा : ४ सप्टेंबर,

             पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील सारसई धनगरवाडा येथील स्मशानभूमीचे पत्रे पावसात उडाल्याने येथील स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झाली असून ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे
          आपटा ग्रामपंचायत  सारसई धनगरवाडी  येत असून येथे धनगर  समाजाची सुमारे ६० घरांची लोकवस्ती आहे.या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीचे पावसाळ्यात वाऱ्यामुळे पत्रे उडाल्याने येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे या स्मशान भूमीकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 
             त्यामुळे पावसात एखादी घटना घडली तर   पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली असल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या विरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या स्मशानभूमीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन त्यावर पत्रे बसवावे अशी मागणी सारसई  ग्रामस्थांनी केली आहे.  

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,