सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,

 सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,





पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : २१ सप्टेंबर,

       महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि रायगडचे मा.पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष खालापूर तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव यांच्या पुढाकारांने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यांत आला.
              यावेळी जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दिपक बेहरे,माजी जि.प सभापती नरेश पाटील, जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष अतुल बडगुजर, युवा मोर्चा विधानसभा प्रमुख प्रसाद पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नागेश पाटील, रवींद्र पाटील तालुका सरचिटणीस, जगदीश आगीवले जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा, मयूर पाटील, महेश कडू, अनिल जाधव, हरिभाऊ जाधव, विकास रसाळ, भरत महाडिक, लवेश कर्नूक, ज्ञानेश्वर पारंगे, दत्ताराम पाटील, अरुण घोंगे, संदीप मोरे, मुनीर धनसे, राकेश म्हामुणकर, प्राणेश देशमुख, मनिष पाटील, मिलिंद दाभोलकर, नवनाथ हडप आदी उपस्थित होते.
           तसेच चौक येथे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे व तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे यांच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी सरपंच रितू ठोंबरे,तुपगाव सरपंच रवींद्र कुंभार,चौक शहर अध्यक्ष गणेश कदम, माजी तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, गणेश मुकादम, दर्शन पोळेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर