तळवली येथे चारसुत्री भात लागवड,कृषि अधिकारी यांच्या माध्यमातून पुर्ण
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
तळवली : १३ जुलै,
तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरलेल्या भाताचे राब उत्तम प्रकारे झाले असून तालुक्याच्या ठिकाणी भात लागवड सुरु करण्यात आली आहे.मात्र कृषि अधिकारी यांच्या माध्यमातून भात लागवड केल्यांस निश्चितच उत्तम असे धान्य मिळत असते.यामुळे तळवली येथे असणारे शेतकरी देविदास मालकर यांच्या शेता मध्ये चारसुत्री भात लागवड हा कार्यक्रम हाती घेण्यात आले.ही लागवड एका दो-यात घेवून लागवड केली जाते त्यांस पट्टा लागवड म्हणून सुद्धा संबोधले जात असते.
हे लागवड करण्यासाठी अल्प शेत मंजुरांची आवश्यकता असते.शिवाय या मधून अधिक उत्पन्न मिळत असते.वनशेती तत्रांचा उपयोग करुन ,भातपिकांसाठी गिरिपुष्प हिरवळीच्या खताचा मर्यादित वापर झाडाचा पाला / आर त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता वाढण्यांस मदत होते.यासाठी तळवली येथे हा चारसुत्री कार्यक्रम हाती घेण्यात आला.ही लागवड ऐसेंरा तंत्रज्ञान असून शास्त्रीय दृष्ट्या कार्यक्षम असल्यामुळे लागवडीसाठी बी,मजूर,खत यांचा खर्च कमी होत असतो.त्याच बरोबर वातावरणातील प्रदूषणांचा विपरित परिणाम न होता ,भात शेती मोठ्याप्रमाणावर उत्पन्न मिळवून देत असते.असे अधिकारी यांचे मत आहे.
दिवसेंदिवस शेतीचे उत्पन्न घटत असून शेतकरी शेतीकडे पाठ फिरवत आहे.मात्र कृषि खात्याच्या माध्यमातून आणी त्यांचे मार्गदर्शन घेवून भात लागवड केल्यांस उत्तम असे अधिक पिक मिळत असते.शेतीची प्रत सुधारावी शिवाय तालुक्यातील शेतकरी वर्गांनी जास्तीत जास्त शेतीमधून उत्पन्न घ्यावे यासाठी कृषिखाते वेळोवेळी शेतकरी वर्गांस मदत करीत असते.
उपविभागीय कृषि अधिकारी खोपोली नितीन फुलसुंदर, तालुका कृषि अधिकारी खालापूर सुनिल निंबाळकर, मंडळ कृषि अधिकारी खालापूर जे .के .देशमुख,कृषि पर्यवेक्षक चौक नितीन महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक चार सुत्री भात लागवड कार्यक्रम घेणेत आला कृषी सहाय्यक प्रशांत कदम यांनी चार सूत्री भात लागवड बाबत मार्गदर्शन केले. शेतकरी उपस्थित होते.यावेळी शेतकरी म्हणून मधुकर मालकर,पोलीस पाटील - मारुती पाटील,ग्रूप ग्राम पंचायत वडगांव सदस्य - संदेश मालकर,देविदास मालकर,रुपेश मालकर,सागर मालकर ,वैभव लभडे,महेंद्र मालकर,अतुल मालकर,धृव मालकर,स्वप्नील मालकर,विष्णू मालकर अदि शेतकरी उपस्थित होते.
0 Comments