राजिप शाळा वडगाव यांस एक्झॉनमोबिल कंपनी,व अगस्त्या फाऊंडेशन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
वडगाव : १६ नोव्हेंबर,
एक्झॉनमोबिल कंपनी माध्यमातून व अगस्त्या फाऊंडेशन वतीने रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांस मुलांना दप्तर,पाणी बॉटल,वह्या,कंपास,पेन व स्वयं अध्ययन पुस्तिका व आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.शाळेत गरजू व दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षण घेत असून या मुलांच्या शैक्षणिक दर्जा निर्माण व्हावे यासाठी हे पाऊल उचलले असल्यांचे एक्झॉनमोबिल कंपनी चे सीएसआर प्रमुख मयुरेश महाजन यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करतांना आपले मत व्यक्त केले.
यावेळी जॉजू सर,शिवम चौबे,श्रीराम अय्यर, रुषाली सक्सेना,अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन महाराष्ट्र प्रमुख - पराग सावंत,सोनाली सिकदर,सार्थक सपकाळ,शुभांगी लोंढे,हरिश्चंद्र सूर्यवंशी व अनिल चासकर,व्यवस्थापन समिती अध्यक्ष करूणा ठोंबरे,उपाध्यक्ष राजश्री जांभुळकर,शिक्षिका सरस्वती कवाद,पदविधर शिक्षक मयुरी धायगुडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सदस्य स्वप्नील जाधव,शिल्पा जाधव,कीर्ती गडगे,संगीत गडगे,शुभद्रा दळवी,नीता राऊत अंगणवाडी सेविका व मोठ्या संख्यने पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी केले,तर आभार उप शिक्षक वैजनाथ जाधव यांनी मानले.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अगस्त्या फाऊंडेशन च्या शुभांगी लोंढे,प्रराग सावंत यांच्यासह स्वयं सेविका निकिता गडगे, साक्षी जांभुळकर,वेदिका गडगे,आकांक्षा जाधव,भाग्यश्री तांबोळी व पालकांचे सहकार्य केले.
----------चौकट ----------
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी आमची एक्झॉनमोबिल कंपनी तत्पर असून कोणत्याही मदतीसाठी कायम सोबत असेल.
सीएसआर प्रमुख एक्झॉनमोबिल इसांबे - मयुरेश महाजन
----------चौकट ----------
अगस्त्या फाऊंडेशन सदैव विज्ञान या विषयाच्या माध्यमातून व अनेक व्यावसायिक संस्थांच्या सीएसआर च्या माध्यमातून विद्यार्थी हित जोपासत आली आहे.भविष्यातही सदैव सोबत राहू.
महाराष्ट्र व्यवस्थापक अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन - पराग सावंत
----------चौकट ----------
आज शाळेला जे नावलौकिक प्राप्त आहे यात विद्यार्थी,पालक,शाळा व्यवस्थापन ,स्थानिक स्वराज्य संस्था व एक्झॉनमोबिल सारख्या अनेक व्यावसायिक कंपन्या व अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन चे सहकार्य आहे.
मुख्याध्यापक शाळा वडगाव - सुभाष राठोड
0 Comments