विकास कामाच्या जोरावर महेश बालदि पुन्हा आमदार होणार मा.सरपंच माजगांव- गोपीनाथ जाधव
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
आंबिवली / माजगांव : १७ नोव्हेंबर,
उरण मतदार संघाचे उमेदवार महेश बालदि हे आमदार असतांना यांनी विकास कामासाठी स्वताला झोकून दिले होते.तालुक्यातील अनेक समस्या मार्गी लावल्या, ग्रूप ग्राम पंचायत माजगांव या परिसरातील असलेल्या गावांच्या पिण्यांचा पाण्यांचा प्रश्न मार्गी लावला.यामुळे महिला वर्गांच्या डोक्यावरील हंडा उतरविला असल्यामुळे या विकास कामामुळे ते पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून येणार असा विश्वास प्रचार करीत मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांनी व्यक्त केला.
या परिसराचा तसेच तालुक्याचा विकास करायचे असेल तर कमल शिवाय पर्याय नाही,जातीचे राजकारण बाजुला ठेवून विकास कामे करणा-या व्यक्ती निवडूण आणा असे भावनिक आवाहन यावेळी करण्यांत आले.विकास कामे करण्यांसाठी मनामध्ये आत्मियता हवी असावी लागते.आणी ती महेश बालदि यांच्या मध्ये आहे.यामुळे २० नोव्हेंबर ला मतदान करुन महेश बालदि यांस निवडूण आणा असे अवाहन करण्यांत आले.
निवडणूका तोंडावर आली की जातीचे राजकारण निर्माण होत असते.मात्र एखाद्या वेळी आपण आजारी पडलो की आपण डॉक्टर कडे जातो.यावेळी डॉ.कोणत्या जातीचा आहे.हे पाहत नाही मात्र त्याच्या कडे गेल्यांस आपला आजार बरा होतो.तसेच महेश बालदि हे विकास कामाचा निधी कसा घेवून यायंच आणी विकास कसा करायचा हे चांगले माहित यामुळे या विकास कामाच्या जोरावर पुन्हा निवडूण येणार असल्यांचे भाकित मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांनी व्यक्त केले.
0 Comments