राजिप शाळा रायगड जिल्ह्यात प्रथम

 राजिप शाळा रायगड जिल्ह्यात प्रथम,तर मुंबई विभाग मध्ये  द्वितीय शाळेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते,सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व धनादेश देवून गुण गौरव 




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
मुंबई : १५ ऑक्टोबर,
  
         रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव रायगड जिल्ह्यात प्रथम,तर मुंबई विभागात द्वितीय क्रमांकावर यशस्वी पणे उतुंग झेप घेतली.विविध उपक्रम राबवून या शाळेमध्ये अमुलाग्र बदल घडविला त्याच बरोबर विद्यार्थ्यांची पट संख्या चा अलेख वाढत चालला असून, शाळेमध्ये डिजिटल स्वरुपात,शिक्षण,या सर्व तत्वाचा आभ्यास करुन महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग,मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा या निष्कर्षावर या शाळेला शिक्षक,शालेय कमिटी यांना शाळेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व धनादेश देवून गौरविण्यांत आले.


                  विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास व्हावे यासाठी, शिक्षक तसेच ग्रामस्थ त्याच बरोबर मा.सरपंच एम.के गडगे आणी त्यांच्या पत्नी मा.सरपंच गौरी गडगे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.तसेच ते या कार्यक्रमास उपस्थित होते .हा पुरस्कार सोहळा मुंबई येथे संपन्न झाला.यावेळी शाळेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर,मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे,शिक्षण सचिव - कुंदन मॅडम,मा.शिक्षण आयुक्त सुरज मांढरे,अदि मान्यवारांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व धनादेश देऊन गौरविण्यात आले.

             तसेच या कार्यक्रमासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध पदावर कार्यरत असलेले अधिकारी यांनी या ठिकाणी उपस्थित होते. मा.शिक्षणाधिकारी - पुनीता गुरव,शिक्षणाधिकारी तुपे सर शेडगे सर, उपशिक्षणाधिकारी,कैलास चोरामले,गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती खालापूर, शिल्पा दास,शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती खालापूर,देविदास पाडवी केंद्र प्रमुख,जगतसिंग परदेशी, उपस्थित होते.

            मुख्याध्यापक सुभाष राठोड, शाळा व्यवस्थापन समिती - करुणा ठोंबरे,अध्यक्ष ,राजश्री जांभुळकर,उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,नीता  राऊत,अंगणवाडी सेविका,वडगाव,सरस्वती  कवाद, विषय शिक्षिका,वैजनाथ जाधव,उप शिक्षक,मयुरी धायगुडे,पदविधर शिक्षण सेविका,मोहन दिनकर दहिफळे,उप शिक्षक,रवींद्र  घोगरे,उप शिक्षक,उज्वला  राठोड,मीनल गडगे,निकिता गडगे,स.से.,साक्षी  जांभूळकर,स.से.,भाग्यश्री तांबोळी,स.से.,आकांक्षा जाधव,उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर