मराठा,कोळी,आगरी,अदिवासी यांची भर सभेत इज्जत काढत असलेला आमदार यांची जागा दाखवून द्या : प्रितम जे. एम.म्हात्रे
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
मोहपाडा : १८ नोव्हेंबर,
शेतकरी कामगार पक्ष हा कष्टकरी जनतेचा असून,या पक्षाच्या माध्यमातून विविध ठिकाणी कार्यशाळेचे आयोजन केले आहे.यावेळी उरण आमदाराचा भरपूर समाचार घेतला.ये व्यापारी असून जनतेचे नसून व्यापारांचे आहे.मात्र मी माझ्या वडीलांच्या प्रेमापोटी जनतेसाठी सेवेसाठी लढायचे असल्यांचे सांगितले.यावेळी ते बोलतांना म्हणाले एचओसी सारख्या कारखान्यांचे कामगार विषयी भावनिक साद घातली.मात्र विरोधक म्हणतात की शेकाप संपला नाही तर पनवेल उरण मध्ये शेकाप पक्ष जिवंत आहे.मात्र मराठा कोळी आगरी,अदिवासी यांची भर सभेत इज्जत काढत असेल तर आमदाराला त्यांची जागा दाखवून द्या असे प्रतिपादन,मोहपाडा येथे अचानक क्रिडा मैदानात प्रचार सभेत महाविकास आघाडी इंडीया अलायन्स पुरस्कृत भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रितम जे.एम.म्हात्रे यांनी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र सर चिटणीस - जयंत पाटील,जे.एम म्हात्रे, ,मराठा समाज नेते - विनोद साबळे,कृषी उत्पन्न बाजार समिती उप सभापती जयवंत पाटील,शेकाप - ज्ञानेश्वर मोरे,मारुती महाराज पाटील,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष - प्रविण कांबळे,राज रत्न आंबेडकर - पंकज सोनावणे,जगदिश पवार,नारायण घरत,वक्ते - शिवाजी काळे,गजानन माळी,भुषण पाटील,महेश साळुंखे अदि पदाधिकारी यांनी विरोधकार आपली तोफ डागळली.
यावेळी ते बोलतांना म्हणाले की कर्नाळा बॅंक चे ९७ टक्के कॅश ठेवेदारांची व्याजा सकट परत केले आहे.हे फक्त शेकाप करु शकते.यामुळे शेकाप सातत्याने जनतेच्या पाठीशी आहे.अंतराष्ट्रीय विमानतळ येथे ४४ तरुणांना दिड महिन्यात नोक-या दिल्या मला आमदार म्हणून निवडून दिल्यास तरुणांच्या हाताला काम देण्यांचे अश्वासन यावेळी दिले.मोहपाडा तसेच मोर्बे धरण येथिल ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावणार असल्यांचे सांगितले,उरण च्या आमदाराने मराठा कोळी आगरी,अदिवासी यांची भर सभेत इज्जत काढत आहे. मतदानांच्या दिवशी २० नोव्हेंबर ला त्यांची जागा दाखवून द्या,मात्र मला एक संधी द्या त्याच सोनं करेल,आपण तरुण वर्गांना नोक-या दिल्या कामावरुन काढून नाही टाकले असा गौर उदगार प्रितम जे.एम म्हात्रे यांनी काढले.
0 Comments