कलोते डॅम च्या पाण्यात पाळीव प्राण्यांचे मळ,मुत्र,विष्ठा २० ते २५ मुलांना कावीळची लागण,ग्रूप ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष्य,आरोग्य खाते बेसावध

 कलोते डॅम च्या पाण्यात पाळीव प्राण्यांचे मळ,मुत्र,विष्ठा  २० ते २५ मुलांना कावीळची लागण,ग्रूप ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष्य,आरोग्य खाते बेसावध 




पाताळगंगा न्युज  : वृत्तसेवा                                                       कलोते मोकाशी  : १५ ऑक्टोबर,


                   ग्रूप ग्राम पंचायत कलोते मोकाशी  येथे मोठे डॅम असून या माध्यमातून येथिल ग्रामस्थांच्या पिण्यांच्या पाण्यांचा प्रश्न मार्गी लागला जात आहे.मात्र या ठिकाणी पाळीव प्राणी पाळले जात असल्यामुळे त्यांचे मळ,मुत्र,विष्ठा या पाण्यांत मिसळले जात असल्यामुळे हे पाणी दिवसेंदिवस दुषिद्ध होत चालले आहे.मात्र येथिल स्थानिक कार्यकर्ते यांच्या वरद हस्तामुळे या मालकांस भय वाटत नाही.हेच पाणी या परिसरात ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्यामुळे येथिल २० ते २५ लहान मुलांना कावीळ ची लागण लागल्यांचे चित्र समोर आले आहे.                                            पुर्वी या कलोते डॅम चे पाणी शुद्ध होते.मात्र गेल्या काही वर्षामध्ये या ठिकाणी धनिकांनी येथिल शेतकरी वर्गांच्या जागा घेवून या ठिकाणी फार्म हाऊस तसेच पाळीव प्राणी पाळले जात असल्यांचे निदर्शानास येत आहे.या ठिकाणी उंट,गाय,विविध जातीचे कुत्रे,घोडा,ससे माजर,या ठिकाणी असून आजारी प्राण्यावर येथे उपचार केले जात असते.तसेच यांचा मल मुत्र विष्ठा हे या डॅम च्या संपर्कात येत असल्यामुळे दिवसेंदिवस पाणी दुषिद्ध होत चालले आहे.                                                                                   विशेष म्हणजे ग्रूप ग्राम पंचायत कार्यालय याच गावात असून या कडे साफ दुर्लक्ष्य केले जात,त्याच बरोबर हाकेच्या अंतरावर खालापूर,चौक ग्रामीण रुग्णालय आहे.मात्र आरोग्य खाते बेसावध असल्यांचा आरोप ग्रामस्थ करीत आहे.या परिसरातील स्थानिक कार्यकर्ते यांचा पाठबळ असल्यामुळे कुणालाही न जुमानता राजरोसपणे येथे पाळीव प्राण्यांचा व्यवसाय सुरु आहे.या संदर्भात येथिल ग्रामस्थ अक्रमक झाले असून शासकिय पातळीवर निवेदन देण्यांत आले.मात्र या डॅम धनिकांची वक्र दृष्टिमुळे पिण्याच्या पाण्याला ग्रहण लागले असल्यांचे समोर आले आहे.

     

              कावीळ झालेले बालक रुग्ण 

मयुर किरण पाटील,रिषभ ठोंबरे,वरद ठोंबरे,जानवी ठोंबरे,मधीरा सावंत, मनिष सावंत, स्वरा ठोंबरे,भुषण ठोंबरे अशी अनेक मुले कावीळ बाधित आहे.तसेच काहीची नावे समजली नाही.मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राने मुलांची तपासणी करावी असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन