भाजपकडून किरण ठाकरे यांची मनधरणी?
भाजपाच्या किरण ठाकरेंचा अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांची मध्यस्ती, भाजपनेते देवेंद्र फडणवीसांच्या समोर होणार अंतिम निर्णय?
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापूर : ३ नोव्हेंबर,
कर्जत खालापूरमध्ये होणाऱ्या चौरंगी लढतीबाबत अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. बंडखोरी करत उमेदवारी दाखल करणारे भाजपचे किरण ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा यासाठी किरण ठाकरे यांची पक्षाकडून समजूत काढली जाते. नुकताच राज्याचे मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे आज बैठक झाली असून किरण ठाकरे हे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितलं होतं. मात्र युतीधर्म पाळत किरण ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी रवींद्र चव्हाण यांच्याकडून त्यांची समजूत काढण्यात आली आहे.
अर्ज माघारी घेण्याबाबत अंतिम निर्णय झाला नसून भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंतिम निर्णय होईल अशी माहिती किरण ठाकरे यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर किरण ठाकरे हे भेट घेणार असून अर्ज माघारी घेण्याबाबत निर्णय होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे स्वतः मध्यस्थी करणार असल्याचे देखील समजतंय. त्यामुळे किरण ठाकरे हे वरिष्ठांच्या आदेशाने उमेदवारी अर्ज माघारी घेणार का हे पाहणं देखील औस्तुक्याचे ठरेल.
इतकच नव्हे तर अर्ज माघारी घेतल्यानंतर किरण ठाकरे यांच्यासह त्यांचे समर्थक कार्यकर्ते हे युतीधर्म पाळत महेंद्र थोरवे यांनाच मदत करतील की वेगळा निर्णय घेतील हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरेल.यावेळी मा. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, मा. आमदार सुरेश लाड व कर्जत खालापूर मधील भाजपचे तळागाळातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments