सामाजिक कार्यकर्ते भरत महाडिक यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना वह्या वाटप
हनुमंत मोरे
खोपोली / वावोशी : १७ जुलै,
भाजपाचे साजगाव जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष भरत महाडिक यांनी सामाजिक सेवेसाठी घेतलेली मेहनत आणि यासाठी अनेक लोकांकडे जाऊन केलेले प्रयत्न खूप मोलाचे आहेत.गरिबांप्रति त्यांच्या मनात असलेल्या तळमळीने ते एवढे भावूक होत असतात हे पाहून मुंबई येथील प्रसिध्द उद्योजक विनित लोहिया यांनी करंबेळी ठाकूरवाडी येथील
आदिवासी मुलांना वह्या व खाऊ पाठवून देत.भरत महाडिक यांनी सुरू केलेल्या समाजसेवेच्या कामात आपला सहभाग दाखविल्याने आदिवासी बांधवांनी उद्योजक विनीत लोहिया व समाजसेवक भरत महाडिक यांचे आभार व्यक्त केले आहेत.
खालापूर तालुक्यातील करंबेळी ठाकूरवाडी हे गाव डोंगर दरीत वसलेले आहे.या गावाकडे जाणारा रस्ता अवघड पायवाटेच्या असून डोंगर चढून तेथे जावे लागते येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून येथे शिकविण्यासाठी नियमित जाणाऱ्या शिक्षकांचे खऱ्या अर्थाने कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.या शिक्षकांची मेहनत व आदिवासी मुलांची शिक्षणातील गोडी पाहून या मुलांसाठी आपणही काहीतरी करावे अशी प्रामाणिक इच्छा दाखविणारे सामाजिक कार्यकर्ते भरत महाडिक यांनी आपल्या ओळखीतील अनेक लोकांना याबाबतीतील विदारक चित्राचे वर्णन करून मदतीची हाक मारली.
त्यांची सेवा करण्याची पध्दत पाहून अखेर मुंबई येथील प्रसिध्द उद्योजक
विनित लोहिया यांनी भरत महाडिक यांना आपण या कामासाठी पैसे पाठवितो असे सांगितले परंतु आपल्याकडून त्या पैशातून खरोखरच सेवा होईल का?असा प्रश्न निर्माण झाल्याने आपणास पैसे देऊ नयेत तर त्यापेक्षा वस्तु खरेदी करून द्या मी वाटण्याचे काम करतो असे सांगून आपल्यातील निष्कलंक सेवेची प्रचिती त्यांनी दाखवून दिल्याने उद्योजक श्री.विनित लोहिया यांनी सुध्दा भरत नारायण महाडिक यांचे कौतुक करून महाडिक यांच्या सेवेत सहभागी होत.
शैक्षणिक साहित्य पाठवून दिले.हे साहित्य स्वतः भरत महाडिक व त्यांचे सहकारी मित्र यांनी करंबेळी ठाकूरवाडी येथे जाऊन तेथील शाळेतील विद्यार्थ्यांना दिले.भरत महाडिक यांनी वह्या व खाऊ वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता.
0 Comments