माथेरान पर्यटकांनी हाऊसफुल्ल ! रूम्स उपलब्ध न झाल्याने अनेकांचा परतीचा प्रवास;व्यावसायिकांचे व्यवसाय तेजीत

 


मुकुंद रांजाणे
माथेरान : ९ जुलै, 

                वर्षाऋतु मध्ये सर्वच पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी होत असून काही ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त असल्याने त्या भागातील धबधब्यावर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे मुंबई पासून अगदीच जवळचे पर्यटनस्थळ म्हणून अनेकांनी माथेरानला पसंती दिली. हॉटेल्स त्याचप्रमाणे लॉजिंग सुध्दा फुल्ल झाल्या असल्यामुळे अनेकांना रूम्स उपलब्ध न झाल्याने परतीच्या वाटेवर जावे लागले.                                                       दुसरा शनिवार असल्याने या ठिकाणी पर्यटकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केलेली पहावयास मिळाली. माथेरानला येण्यासाठी नेरळ येथे टॅक्सी साठी लांबच लांब रांगा लागल्यामुळे दस्तुरी नाक्यावर खाजगी वाहनांची पार्किंग व्यवस्था वनखात्याने उत्तम प्रकारे केल्यांचे पहावयास मिळाले.या ठिकाणी जवळपास सहा हजार पर्यटकांनी हजेरी लावल्याने इथे यात्रे सारखे स्वरूप प्राप्त झाल्यांचे पहावयास मिळाले.रस्त्यावर सर्वत्र पर्यटकांची रहदारी आणि त्यातच कुणी हातरीक्षा आणि घोड्याचा आधार घेऊन माथेरान गाठत होते .रेल्वेच्या शटल सेवेचा आनंद घेण्यासाठी सुध्दा अमन लॉज रेल्वे स्टेशन मध्ये पर्यटकांनी प्रचंड गर्दी असल्यांचे दिसत होते.
                      लहानमोठ्या स्टोल्स धारकांसह रेस्टॉरंट, कँटीन, चिक्की चपला दुकानदार या सर्वांचा व्यवसाय तेजीत दिसत असून.खरेदीसाठी बाजारात खूपच रेलचेल यावेळी पहावयास मिळाली. त्यातच पावसाच्या रिमझिम जलधारा अंगावर झेलत पर्यटक पॉईंट्स वरील नयनरम्य देखावे न्याहाळण्यासाठी कुणी पायी चालत तर कुणी घोडेस्वारी करून हातरीक्षा मधून आनंद घेत होते. घाटरस्त्यात असणाऱ्या धबधब्याच्या खाली असंख्य पर्यटक मनसोक्त पणे भिजत होते.माथेरान मध्ये धबधबा नसल्याने शारलोट तलावाच्या ओसंडून वाहणाऱ्या पाण्याखाली धबधब्याचा आनंद घेण्यात सुध्दा पर्यटकांना समाधान वाटत होते.

चौकट 
----------------------------------------------------
आम्ही पती पत्नी यावर्षी पहिल्यांदाच माथेरानला आलो होतो. एवढी प्रचंड गर्दी अन्य कोणत्याही पर्यटन ठिकाणी मी पाहिली नव्हती.परंतु या सुट्टयांच्या हंगामातील वाहतुकीचे आणि राहण्याच्या रूम्सचे दर ऐकून आम्ही दोघेही अवाक झालो. एवढ्या खर्चात तर आम्ही विमानाने  गोवा रिटर्न होऊ शकतो एवढा खर्च इथे होणार होता त्यासाठी आम्ही इथून काढता पाय घेतला.परंतु पुढील वेळेस सुट्ट्याचे दिवस सोडून मंदीच्या वेळी आम्ही नक्कीच भेट देऊ कारण इथली शांतता आणि गर्द झाडी मनाला उभारी देते शरीराला ताजेतवाने करते शुअर वुई विल कम बॅक नेक्स्ट टाईम गुड बाय माथेरान.
नागार्जुन अवस्थी ---पर्यटक मुंबई
---------------------------------------------------

Post a Comment

0 Comments

मराठा,कोळी,आगरी,अदिवासी यांची भर सभेत इज्जत काढत असलेला आमदार यांची जागा दाखवून द्या : प्रितम जे. एम.म्हात्रे