खोपोलीत ठाकरे गट शिवसेनेची महिला आघाडी आक्रमक -(भाजपाच्या किरीट सोमय्या यांचा केला निषेध, खोपोली पोलिस ठाण्यात दिले निवेदन)

 


खोपोलीत ठाकरे गट शिवसेनेची महिला आघाडी आक्रमक -(भाजपाच्या किरीट सोमय्या यांचा केला निषेध, खोपोली पोलिस ठाण्यात दिले निवेदन)

 हनुमंत मोरे 
खोपोली / वावोशी : १८ जुलै 

         विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत अडचणीत आणणारे भाजपाचे किरीट सोमय्या याची आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ लोकशाही वृत्तवाहिणीने प्रसारित होताच महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला राज्यात आक्रमक झाले आहेत.१८ जुलै रोजी खोपोलीत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रायगड उपजिल्हा संघटीका अनिता पाटील आणि अल्पसंख्याक सेल रायगड जिल्हा अध्यक्ष जैबुनिसा शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी किरीट सोमय्या यांचा निषेध करीत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

                यावेळी उपजिल्हा संघटीका अनिता पाटील, अल्पसंख्याक सेल रायगड जिल्हा अध्यक्ष जैबुनिसा शेख, तालुका संघटक  शैला भगत, विधानसभा संघटक सुविधा विचारे, संपर्क संघटक छाया सावंत,युवती तालुका अधिकारी संगीता पाटील, शहर संघटक किशोरीताई शिगवण,खोपोली शहर युवती सेना आधिकारी आदिती पवार, उपशहर संघटक शिळफाटा किरण दळवी, शहर समन्वयक संगीता गुरव,वडगांव जिल्हा विभाग संघटक भारती लोते, शहर तालुका संपर्कप्रमुख सुखदा बने, शहर तालुका संघटक असावरी घोसाळकर, शांतीनगर संघटक रेश्मा  शाहिद शेख,मीना दळवी, शोभा भोसले, शहराधिकारी कीर्ती पाटील आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
           

   किरीट सोमय्या यांचा निषेध करीत कठोर कारवाईची मागणीचे निवेदन खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश घरबुडे यांच्याकडे दिले. दुसऱ्यांचे घोटाळे बाहेर काढणारे किरीट सोमय्या आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ चिखलात लोळत असल्याची टिका उपजिल्हा संघटीका अनिता पाटील यांनी करीत सोमय्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. महिलांच्या भावना दुखवणाऱ्या व्हिडिओमुळे अल्पसंख्याक सेल रायगड जिल्हा अध्यक्ष जैबुनिसा शेख यांनीही निषेध केला आहे. युवती सेना अधिकारी आदिती गुरव यांनीही आक्रमक पवित्रा घेत किरीट सोमय्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

Post a Comment

0 Comments

संताच्या चरणावर  मस्तक ठेवले तर मानवी जीवन धन्य होतो. ह.भ.प.रामदास भाई महाराज पाटील