प्रचारास तरुण वर्गासह ज्येष्ठांचा उंदड प्रतिसाद, घरोघरी उमेदवार यांचे औक्षण,
संतोष बैलमारे, प्रमिला पाटील,पुनम म्हात्रे उमेदवार भरघोष मतांनी निवडून येतील मतदाराजांनी केला विश्वास व्यक्त
माय मराठी न्यूज : वृत्तसेवा
खालापूर : 26 जानेवारी,
सावरोली जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या उमेदवार यांचा चौथ्या दिवशी तरुण वर्गासह ज्येष्ठ नागरिकांचा उदंड प्रतिसाद पहावयास मिळाला,त्याच बरोबर ज्या गावामध्ये प्रचार दवरा असताना घोष वाक्यांनी तसेच राष्ट्रवादी गाण्यामुळे घरा - घरामध्ये हा प्रचार पोहचविण्याचे काम उमेदवार समवेत कार्यकर्त व मतदार राजा करीत आहे. तालुक्याच्या ठिकाणी संतोष बैलमारे यांचा चाहता वर्ग मोठया प्रमाणात असल्यामुळे प्रचार रॅलीत यात्रेसारखे स्वरूप प्राप्त होत आहे.त्याच महिला वर्ग औक्षण करण्याची लगबग सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.
सकाळी दहा वाजल्या पासुन ते रात्री नऊ वाजल्या प्रचार सुरू असतान कोणताही कार्यकर्ता न थकता आपल्या नेत्याच्या प्रचार करण्यासाठी सक्रिय असल्याचे पहावयास मिळाले आज निगडोली, नडोदे, विचार वाडी, खैरवाडी, माडपवाडी, माडप ठाकूरवाडी, तसेच माडप या गावांमध्ये प्रचाराची घोडदळ सुरू असलेले पहावयास मिळाले. गेली चार दिवस मोठ्या प्रमाणात परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते प्रचार करण्यास सक्रिय झाल्यामुळे प्रत्येकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
आज प्रचाराचा चौथा दिवस असताना सुद्धा सावरोली जिल्हा परिषद संतोष बैलमारे व पंचायत समिती सावरोली प्रमिला पाटील, तसेच पंचायत समिती वाशिवली पुनम म्हात्रे या निवडणुकीमध्ये उभे असताना यश आपल्याच पारड्यात नक्कीच पडेल अशी शाश्वती प्रचार रॅलीत पहावयास मिळाली. प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारा नेता अशी ओळख असल्यामुळे आज प्रत्येक ठिकाणी विशेष करून प्रत्येक गावात जात असताना मानसन्मान मिळत असून आमचं बहुमूल्य मत हे घड्याळ, व मशालीला दिले जाईल असे आश्वासन यावेळी मतदार राजा देते आहे.शिवसेनेचे नेते उत्तम प या शेठ भोईर, सुनिल थोरवे यांच्या प्रचारात आगमनामुळे कार्यकर्ते यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच बरोबर शेकडो कार्यकर्ते तसेच उमेदवार यांचा चाहता वर्ग उपस्थित होते.








0 Comments