उत्तम शेठ भोईर,सुरेश पाटील यांच्या आगमनाने विरोधकांचे धाबे दणाणले,

 उत्तम शेठ भोईर,सुरेश पाटील यांच्या आगमनाने विरोधकांचे धाबे दणाणले, विजयाचा इंद्रधनुष्य लागले दिसायला 

माय मराठी न्यूज :  वृत्तसेवा 
सावरोली : 26 जानेवारी,



        प्रचार म्हटले की मतदार राजा समवेत नेत्याचे आगमन हे उमेदवार साठी नवसंजीवनी मिळत असते.मात्र तीन दिवसानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला रंगत आल्याचे पहावयास मिळत आहे एकी कडे मराठा सामानाची ढाल म्हणून संबोधले जाणारे उत्तम शेठ यांची निवडणुकीतून माघार म्हणजे त्यांनी आपल्या परिवर्तन विकास आघाडी साठी केलेला  त्याग असे बोलले जाते.मात्र आपली सत्ता कायम आपल्याच मित्र पक्षाकडे राहावी यासाठी नरमाईची भूमिका घेत सावरोली जिल्हा परिषद उमेदवार संतोष बैलमारे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने त्यांस पाठिंबा देत मनाचे औदर्य दाखविले 
         त्याच बरोबर सावरोली जिल्हा परिषद मागील निवडणुकीत विजय खेचून आणणारे राष्ट्रवादी नेते तसेच तरुणांचा आधार स्तंभ म्हणून ओळखले जाणारे, त्यांची प्रचार रॅलीत सक्रिय झाल्यामुळे विरोधास घाम फुटले असल्याची राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी आहे.तसेच त्यांचा चाहता वर्ग मोठया प्रमाणात असल्यामुळे असंख्य कार्यकर्ते तसेच मतदार राजा त्यांच्या पाठीशी असल्यामुळे ही निवडणुकीची लढाई सहजपणे जिंकू शकतो असा विश्वास प्रचार रॅलीत पहावयास मिळाला.
         एकंदरीत या दोघांचे सहकार्य लाभले असून प्रचारासाठी सक्रीय असल्यामुळे या प्रचार रॅलीत यात्रे सारखे स्वरुप प्राप्त होत आहे.प्रचार रॅली ज्या गावामध्ये जात असताना फटाक्याच्या अतिशबाजीत उमेदवाराचे स्वागत होत असून फक्त आता गुळाला उधळायला बाकी असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.परिवर्तन विकास आघाडीचे सर्वच उमेदवार बहुसंख्येने निवडणून येतील असा विश्वास निर्माण होत आहे.या दोन्ही मातपगार व्यक्ती मुले जवळ - जवळ ही निवडणुकीची लढाई आपणच जिंकणार असा विश्वास प्रत्येकाकडून व्यक्त केला जातं आहे 



Post a Comment

0 Comments

टी.एन.एम.पब्लिक स्कूल असरोटी,विद्यालयाचे काम कौतुकास्पद नंदकुमार वाळंज