प्रिन्स इलेव्हन क्रिकेट संघ कलोते यांच्या वतीने मैत्री चषक,नाईट क्रिकेट सामने संपन्न,

  प्रिन्स इलेव्हन क्रिकेट संघ कलोते यांच्या वतीने मैत्री चषक,नाईट क्रिकेट सामने संपन्न,

 प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले चिंचवली गोहे संघ 

 माय मराठी न्यूज : वृत्तसेवा  
कालोत  : १३  एप्रिल,

     
           प्रिन्स इलेव्हन क्रिकेट संघ कलोते यांच्या वतीने मैत्री चषक,नाईट क्रिकेट सामने कलोते येथे आयोजित करण्यात आले होते.ह्या स्पर्धेत या परिसरातील ४८  नामवंत संघानी सहभाग नोंदविला, होता.अतितटीच्या सामन्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले चिंचवली गोहे संघ,द्बितीय क्रमांक जिवन  इलेव्हन संघ - मोरबे,तसेच तृतीय - कांढरोळी,चतुर्थ - कैरे,पाचवा - नावंढे,सहावा- माजगाव असे क्रमांक काढण्यात आले.

                 ह्या सामन्यात अंतिम विजेत्यास प्रथम  क्रमांकास एक लाख,रुपये,द्वितीय क्रमांक पन्नास हजार तर तृतीय, चतुर्थ,पाचवा ,सहावा क्रमांक यांस  पंचवीस हजार रुपये, व चषक देण्यांत आले.या सामन्यात जिवन इलेव्हन संघ - मोरबे, संघाचा पराभव करून चिंचवली गोहे संघ  यांनी प्रथम क्रमांक पटकावले.या मध्ये सहा संघाना क्रमांक देण्यात आले.
       

   विजेत्या संघास आकर्षक चषक,देण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज,क्षेत्ररक्षक,मालिकावीर यांस उत्तम बक्षिस देण्यात देण्यांत आले.या क्रिकेट सामन्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना लकी ड्रॉ ठेवण्यात आले होते.यामध्ये प्रथम क्रमांक इलेक्ट्रिकल स्कुटी गौरव कदम वावंढळ,तसेच दुसरे बक्षीस स्मार्ट फोन शिदेश अंबरे,तृतीय वाशिंग मशीन सुप्रिया मिरगळ मुळगाव यांस प्राप्त झाले.

          या क्रिकेट सामन्यांचे आयोजन दिपक पाटील,अशोक पाटील,प्रमोद पाटील,तुकाराम पाटील,प्रियांग दिपक पाटील,आर्यन पाटील,प्रिंस पाटील
अशोक देशमुख,भाई साळुंखे,उज्वल ठोंबरे,गुरुनाथ पालांडे केशव ठोंबरे,रामचंद्र पाटील,सुभाष काईनकर,ज्ञानेश्वर साळुंखे,संतोष ठोंबरे,अप्पा ठोंबरे,नितीन पाटील,तसेच प्रितम दादा म्हात्रे,मोनिका ताई कांबळे यांची उपस्थिती लाभली.हे  सामने पाहण्यासाठी या परिसरातील सरपंच,उप सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा प्रेमी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.







 

Post a Comment

0 Comments

प्रिन्स इलेव्हन क्रिकेट संघ कलोते यांच्या वतीने मैत्री चषक,नाईट क्रिकेट सामने संपन्न,