परिवर्तन विकास आघाडीला आमची साथ, ग्रामस्थांचा निर्धार,
टेंभरी,वयाल,सारंग,पाली, कोपरी, असरोटी उत्तम शेठ भोईर होम ग्राउंड,बालेकिल्ला,
मतदार राजाची घड्याळ, मशालीला पसंती
माय मराठी न्यूज : वृत्तसेवा
चौक : 30 जानेवारी,
परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून दोन दिवस प्रचाराला स्थगिती देण्यांत आली होती.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रमुख नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार विमान अपघातात निधन झाल्यामुळे प्रचार शांत असल्याचे पहावयास मिळाले.मात्र आज प्रचारात पुन्हा एकदा कार्यकर्ते सक्रिय झाले होते.सकाळ पासून चौक पाली, सारंग,आदिवासी वाडी या गावामध्ये प्रचाराची तोफ कडाडली असल्याचे पहावयास मिळाले.दादाचे स्वप्न आम्ही पूर्ण करू असा विश्वास मतदार राजानी परिवर्तन विकास आघाडीला दिला.विशेष म्हणजे मराठा समाजाचे नेते उत्तम शेठ भोईर
टेंभरी,वयाल,सारंग,पाली,कोपरी, असरोटी ही गावे म्हणजे त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जात असल्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभे असल्याचे मतदार राजानी उमेदवार यांस सांगितले.
सावरोली जिल्हा परिषद गटासाठी संतोष बैलमारे,व पंचायत समिती वाशिवली गणासाठी पूनम म्हात्रे या निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्यामुळे तसेच सावरोली पंचायत समिती साठी प्रमिला पाटील ही तिन्ही उमेदवार म्हणजे आपल्यासाठी विकास कामे करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.आम्ही कोणत्याही लोभाला बळी न पडता आमची मते तुमच्या पारड्यात पडली जातील, असा विश्वास यावेळी मतदार राजानी उमेदवार यांस दिला.गेले सात दिवस ज्या गावात प्रचार दौरा करीत असताना मतदार राजाचे उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळाले.
ही निवडणुका प्रत्येकांसाठी मोठी अस्तित्वाची लढाई म्हणून पाहिले जात असताना.मात्र याच ठिकाणी उत्तम भोईर सारखी व्यक्तीमत्व या परिसराला लाभलेले असल्यामुळे शिवाय संपूर्ण प्रचाराची धुरा ते सांभाळीत असून,आपल्या हक्काचा माणूस तुमची सेवा करण्यासाठी तप्तर असून ती संधी त्यास देऊन त्या संधीचे सोनं करण्याची जबाबदारी मतदार राजानी स्वतःवर घेतली आहे.यामुळे जवळ - जवळ विजयाच्या उंबरठ्यावर पोहचली असल्याचे बोलले जाते.यामुळे प्रत्येकांनी जागृत राहून कोणत्याही अमिषाला बळी न पडता घड्याळ, मशाल या चिन्हाला मतदान करा, विरोधकांना जागा दाखवून द्या असे आवाहन प्रचार प्रमुख उत्तम शेठ भोईर यांनी मतदार राजास भावनिक आवाहन करून संबोधले.
या प्रचाराच्या वेळी मा.सरपंच सुनिल थोरवे,मा.सरपंच धनाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरेश पाटील,मा.उप सरपंच राजेश पाटील, मा.पंचायत समिती सदस्य एस.एम.पाटील,राजेंद्र जमदाडे, ज्ञानेश्वर सोंगे,ज्येष्ठ शिवसेना नेते, बाळू गावडे, मनोज गुरव, भरत आपटेकर,जनार्दन बांदल,जनार्दन दिसले, ज्ञानेश्वर पवार,अनंत पाटील,मंगेश जांभळे,काशिनाथ शिंदे,मारुती ठोंबरे,काशिनाथ पाटील,अशोक मेहतर मा.सरपंच, घनश्याम दरोडे, असंख्य कार्यकर्ते महिला वर्ग उपस्थित होते.









0 Comments