राजिप शाळा वडगाव विद्यार्थ्यांनी साधला जॉर्जिया अमेरिकेतील तज्ञांशी ऑनलाइन संवाद
माय मराठी न्यूज : वृत्तसेवा
पाताळगंगा : १७ जानेवारी,
माणिक गडाच्या पायथ्याशी असलेली निसर्गरम्य राजिप शाळा वडगांव डिजिटल असताना एक पाऊल पुढे टाकत गुगल मीट च्या माध्यमातून डॉक्टर संगीता तोडमल पर्यावरण तज्ञ जॉर्जिया अमेरिका यांच्याशी संवाद साधला या दोन ध्रुवांच्या टोकाशी देशातील वर्तमान वेळ तेथील वातावरण हवामान घराची रचना वनस्पती यांच्यातील साम्य व फरक चांगल्या पद्धतीने एक संवाद विद्यार्थ्यांनी साधला.
बदलत्या काळात शिक्षण प्रणाली बदलत असून मुलांच्या मध्ये आत्मविश्वास जागृत होत असल्याचे पहावयास मिळाले.यावेळी मुलानी आपली भारतीय संस्कृती तसेच येणारे सण कसे साजरे केले जाते यांचे वैशिष्ट्ये सांगितले.मराठी शाळा डिजिटल होत असताना सात समुद्रा पार संवाद साधता येतो.यावेळी विद्यार्थ्यांनी अनुभवले.यामुळे येथिल या देशाची पूर्ण स्थिती जाणून घेतली. तसेच अनुभवले.आज आपण डिजिटल माध्यमातून जोडून आपल्याला हवे ते साध्य करू शकतो हे प्रथमच अनुभवले.
आठवड्याच्या एक दिवस दप्तर मुक्त शाळा निर्माण करून नविन काहीतरी शिकवावे यासाठी जॉर्जिया अमेरिकेतील संगीता तोडमल यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले.यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर स्मित झळकत असल्याचे पहावयास मिळाले.यावेळी मुख्याध्यापक सुभाष राठोड सदस्य,पालक व विद्यार्थी तसेच वैजनाथ जाधव,संकेत काठोळे स्वागत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष राजश्री जांभुळकर,यांनी केले,आभार प्रदर्शन मयुरी धायगुडे यांनी मानले.विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कस्तुरी जाधव हिने या सत्राचे सूत्रसंचालन व नेतृत्त्व केले.
---------- चौकट-----------
एक डिजिटल पाऊल ग्रामीण विद्यार्थ्यांना जगाशी जोडण्याचा...हा दप्तरमुक्त शनिवार या उपक्रमनतर्गत सुरू करण्यात आला आहे.जेणे करून विद्यार्थ्यांना शाळेत बसून जगाची अभ्यास सहल करता येईल.आज पहिले पुष्प डॉ.संगीता तोडमल पर्यावरण तज्ञ यांनी खूप छान मार्गदर्शन करत सुरुवात की.पुढच्यावेळी नवीन देशांसह पुन्हा हे सत्र आयोजित केले जाईल.
मुख्याध्यापक राजिप शाळा वडगाव : सुभाष राठोड

0 Comments