कर्जत,सावरगांव येथे चेडोबा व कालिका माता उत्सव साजरा
शेकडो भक्तगणांनी घेतले दर्शन उत्सवात,पालखी,सोहळा,महाआरती
माय मराठी न्यूज वृत्तसेवा खालापूर: १ फेब्रुवारी, |
कर्जत तालुक्यातील सावरगांव येथील असलेले पुरातन कालीन स्वयंभू चेडोबा व कालिका माता वट वृक्षाखाली विराजमान असून गेली 121 वर्ष या ठिकाणी मोठा उत्सव चोडोबा व्यवस्थापक समितीच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे.आज कालिकामातेचा अभिषेक सोहळा शेळके बंधु यांच्या शुभहस्ते सकाळी संपन्न झाला.या ठिकाणी उत्सव असल्यामुळे दर वर्षी मोठ्या उत्साहाने भाविक भक्तगण येत असतात.नवसाला पावणारा चडोबा अशी ख्याती असल्यामुळे आपण केलेला पूर्ण झाल्यावर नवस पूर्ण करण्यासाठी सातत्याने भक्तगण येत असतात.
कर्जत तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेले सावरगांव पूर्वेला उल्हास नदी पश्चिमेला सोंडाई कडा तसेच शिवमंदिर असून दर पौर्णिमेला उत्सव भरत असतो.वर्षभरात अकरा पौर्णिमा साजरी होत असून,विशेष म्हणजे नवरात्र उत्सवामध्ये देवीचा मोठा उत्सव होत असतो.महाराष्ट्रातील काळुबाई,मांढरादेवी तसेच 52 चेडोबाचे हे प्रमुख असल्याचे बोलले जाते.त्याच्या मधले हे प्रमुख आहेत.प्रत्येकाच्या कुळामध्ये चेडोबा,कालिकामाता असून या दैवतेचं शांती करून महाराष्ट्रातील कुटुंब पुढे जात असतात.सर्व परिवाराला सुख शांती मिळावी म्हणून साकडं घालण्यासाठी मंगळवारी,रविवारी,शुक्रवार प्रदोष पोर्णिमा अमावस्या या तिथीला भाविकांची वर्दळ असते.
भाविकांच्या सोयीसाठी ट्रस्ट आणि ग्रामस्थ सज्ज असल्याने या ठिकाणी पहावयास मिळते.1905 पासून श्री चेडोबा व्यवस्थापक समितीची स्थापना करून या ठिकाणी जीर्णोद्धार काम सुरू असून सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे.या उत्सवाच्या निमित्ताने अल्पोपहार- महेश खडे, महाप्रसाद कै. रामदास साळुंके, यांच्या स्मरणार्थ रोहिणी साळुंके (वांगणी) तसेच केशव गणपत शिंदे ( सावरगांव ) यांस कडुन देण्यांत आले.तसेच भजन,कीर्तन तसेच पालखी सोहळा महाआरती अदि कार्यक्रम पौर्णिमेच्या निमित्ताने सुरू होते.
देवस्थान कमिटी अध्यक्ष - बबन ठाणगे, सचिव - अशोक थोरवे,खजिनदार - जितेंद्र करताडे, सदस्य - कृष्णा साळोखे,वाळकु राऊत,गोपाळ राऊत,संताजी साळोखे,महेश ठाणगे,विलास थोरवे,जयराम ठाकरे



0 Comments