हिंदुस्तान पेट्रोलियम कापोरेशन कंपनीने दिली नावंढे ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका - रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा नावंढेमध्ये संपन्न

 


समाधान दिसले                                                      खालापूर : २५ एप्रिल,

             खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागामधील नावंढे ग्रामपंचायतीतील नागरिकांसाठी रुग्ण सेवेसाठी सर्व सोयीयुक्त जीवनदान रुग्ण वाहिका तात्काळ सेवा देण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कापोरेशन लि.मुंबई - पुणे - सोलापूर पाईपलाईन कंपनीने सीआरएस फंडाच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून त्या रुग्णवाहिकाचे लोकार्पण सोहळा २५  एप्रिल रोजी सकाळी ११  वाजता नावंढे ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर संपन्न झाला. यावेळी हिंदुस्तान पेट्रोलियम कापोरेशन लि.व्यवस्थापक चिप स्टेशन मँनेजर गिरिश राऊत यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, हिंदुस्तान पेट्रोलियम कापोरेशन लि.कंपनीच्या माध्यमातून या सर्व सोयीयुक्त रुग्णवाहिकेचा नावंढे ग्रामपंचायत हद्दीसह परिसरात घडणाऱ्या आपत्कालीन घटनेच्या काळात मोठा आधार मिळणार असल्याचे मत मँनेजर गिरिश राऊत यांनी व्यक्त केले.                                                            याप्रसंगी हिंदुस्तान पेट्रोलियम कापोरेशन लि.व्यवस्थापक चिप स्टेशन मँनेजर गिरिश राऊत, मँनेजर विवेककुमार दिनकर, कर्मचारी सुनील पिंगळे, पं.स.सदस्य अक्षय पिंगळे, सरपंच उषा पिंगळे, सदस्य श्रीकांत हाडप, संकेत हाडप, प्रकाश पिंगळे, शारदा वाघमारे, ग्रामसेवक संतोष पवार, कर्मचारी शेखर हाडप सामाजिक कार्यकर्ते रामदास हाडप, विभागप्रमुख रोहिदास पिंगळे, धनाजी फराट, समीर हाडप, तानाजी पाटील, किरण हाडप, दिपक हाडप, निलेश हाडप, हळूराम पिंगळे, चंद्रकांत पिंगळे देविदास तवले, हेमंत हाडप, बाळाराम हाडप, काशिनाथ हाडप, शरद हाडप, प्रशांत पिंगळे, राकेश पिंगळे, कैलास पिंगळे, अंजली पाटील, संजीवनी पिंगळे, शारदा हाडप आदीप्रमुखासह ग्रामस्थ वर्ग उपस्थित होता.                                                                                    खालापूर तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेची ग्रामपंचायत म्हणून नावंढे ग्रामपंचायतीची ओळख या ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक लोकसंख्या असल्याने याठिकाणच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात नावंढे ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी हिंदुस्तान पेट्रोलियम कापोरेशन कंपनी व्यवस्थापनाकडे ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका मिळावी अशी मागणी केली असता मागणीची हिंदुस्तान पेट्रोलियम कापोरेशन कंपनीने दखल घेत नावंढे ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका दिल्याने या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा २५ एप्रिल रोजी ११  वाजता नावंढे ग्रामपंचायत कार्यालयासमोर पार पडल्याने हिंदुस्तान पेट्रोलियम कापोरेशन कंपनी व्यवस्थापनाच्या सामाजिक बांधीलकीचे कौतुक होत आहे.


चौकट -

   नावंढे ग्रामपंचायत हद्दीसह परिसरातील नागरिकांना ही रुग्णवाहिका संकट काळात आधार देणारी ठरणार आहे, मात्र या रुग्णवाहिका कमी लोकांसाठी वापर व्हावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली. ( गिरिश राऊत हिंदुस्तान पेट्रोलियम कापोरेशन लि.व्यवस्थापक चिप स्टेशन मँनेजर)

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण