काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश! ईर्शाळवाडीच्या ग्रामस्थांच्या अश्रूंचा पूर,मदत कार्य सुरु

 


काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश! ईर्शाळवाडीच्या ग्रामस्थांच्या अश्रूंचा पूर,मदत कार्य सुरु 


पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
चौक  : २१ जुलै

          खालापूर तालुक्यातील ईर्शाळवाडी येथे काल रात्री दरड कोसळ्यांने, अनेक माणसे ढिगा-या खाली गाडली गेली.डोळ्यादेखत आपली आई, मुलगा वडील हे दरड खाली गाडले जात असतांना, काळीज पिळवटून टाकणारा या प्रसंग या ठिकाणी निर्माण झाला. काल रात्री पासून मदत कार्य सुरु असतांना आपली आई वडील या मध्ये जिवंत असतील, या विचारांतून डोळे या ठिगा-याकडे टक लावून पाहत आहे.निसर्गाच्या सानिध्यात असलेले गाव एक क्षणांत होत्याच नव्हते झाले. मात्र या ठिकाणी आता आक्रोश आणी अश्रूंचा पुर पहावयास मिळत आहे.

                 या ठिकाणी २०० च्या आसपास  लोकसंख्या असल्यांचे समजते.तसेच ४६ घरे होती. त्याच बरोबर एक रायगड जिल्हा परिषदेची शाळा,आणी समाज मंदिर आणी तीन घरे या दरडतून वाचली असल्यांचे समजते.मात्र या ढिगा-या  खाली अजून किती जण अडकले,अथवा गाडले गेले आहे.हे मात्र अजून समजले नाही.प्रत्येक वेळी आपल्याला विविध माध्यमातून अंदाजे आकडा वर्तवीला जात आहे.मात्र वस्तू स्थिती काय आहे. हे अजून न समजत नाही.ज्या दरडीतून वाचलेले अजूनही या धक्यातून सावरलेले नाही.



             ज्या वेळी ही दरड पडली त्या वेळी  काही मुले या राजिप शाळेमध्ये मोबाईल पाहत होती.मात्र आचानक आवाज आल्यांने ह्या मुलांनी बाहेर जावून आरडा - ओरडा सुरु केला मात्र,दरड काही क्षणांत या ठिकाणी असलेल्या घरांच्यावरती आदल्यांने अनेक घरे या ढिगा-या खाली गाडली गेली आहे.तसेच काही ग्रामस्थ मच्छी पकडण्यासाठी गेले असतांना या डोंगरांची हाळचाल निदर्शनास आल्यामुळे तातडीने आले.मात्र तो पर्यंत या दरडी गाव फस्त झालं होत. 

            काल पासून मदत कार्य सुरु असून आतापर्यंत १६ मृत देह ढिगा-यातून बाहेर काढण्यात आले.त्या बरोबर या ठिकाणी सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.तसेच या शोधकार्यास एनडीफ जवान,तरुण वर्ग,ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामसेवक,आरोग्य विभाग कर्मचारी अदि या ठिकाणी मदत कार्य सुरु आहे.पहाटे पुन्हा मदत कार्य सुरु झाले असून दरड ग्रस्तांना तातपूरती राहण्यांची आणी भोजानांची व्यवस्था करण्यात आल्याचे समजते. स्वता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जावून नातेवाईक यांची विचारपूस करुन आम्ही सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन