सनी महाडिक हजारो समर्थकांसह आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल

 सनी महाडिक हजारो समर्थकांसह आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल 


(शिवसेनेचे सहसंघटक देविदास पाटील व कोयल कणेरकर यांच्या प्रयत्नाला यश )


पाताळगंगा न्युज : हनुमंत मोरे
खोपोली : ११ नोव्हेंबर,

                कर्जत विधानसभा मतदार संघातील खोपोली शहरात विधानसभेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहसंघटक देविदास पाटील व कोयल कणेरकर यांच्या पुढाकाराने सनी महाडीक यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहिर पक्षप्रवेश केला आहे. खालापूर तालुक्यात शिवसेना पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत असून विरोधकांसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

         कर्जत मतदार संघातील खालापूर तालुक्यामधील खोपोली शहरात असलेल्या महाराजा हॉलच्या सभागृहात १० नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत भव्य पक्षप्रवेश पार पडला. त्यामध्ये खालापूर तालुका सहसंघटक देविदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली व कोयल कणेरकर यांच्या प्रयत्नातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल व्यक्तीमत्व सनी महाडिक यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना पक्षात प्रवेश करून आमदार महेंद्र थोरवे यांचे हात अधिक मजबूत करण्यासाठी सक्रियतेने जाहिर पाठिंबा दिला आहे.
    

         ____ कोट----
      कर्जत विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य माणसाशी नाल जोडलेल एक यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांची विशेष ओळख असून त्यांच्या विकासात्मक दूरदृष्टीकोनातून त्यांनी या मतदार संघात भरीव योगदान दिल आहे.त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महिला, युवा आणि वृद्धांसह मतदार संघातील विविध क्षेत्रातील जनता त्यांना भरभरून प्रतिसाद देत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
_____ देविदास पाटील 
सहसंघटक, शिवसेना खालापूर तालुका

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर