तुपगांव येथे रंगला शिव कालीन मर्दानीचा खेळ,शिव व्याख्यान,व किल्ले पारितोषिक वितरण
पाताळगंगा न्युज :वृत्तसेवा
चौक / तुपगांव : १० नोव्हेंबर,
दिवाळी या सणाच्या निमित्ताने किल्ले, टाकावू पासून टिकाव वस्तू निर्मिती,रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले होते,गेली २२ वर्ष हा उपक्रम सुरु असून नुकताच परिक्षकांच्या माध्यमातून निवड करण्यांत आलेल्या सर्व स्पर्धकांना आज तुपगांव येथे श्री संत गोरोबा काका मंदिर या ठिकाणी स्पर्धकांचा गुणगौरव करण्यांत आले.या निमित्ताने सरनौबत नेताजी पालकर मंडळ यांच्या माध्यमातून शिव कालीन मर्दानी प्रात्यक्षिक खेळ, मंडळ महारुद्र मर्दानी खेळ, नवी मुंबई यांनी लाठी काठी, दांडपट्टा, तलवार बाजी,भाला, पाश अश्या विविध खेळातून शिव कालीन खेळाचा प्रात्येक्षिके उपस्थित शिव भक्तांनी अनुभवली.
त्याच बरोबर सायंकाळी शिवव्याख्यान - प्राध्यापक निखिलेश देशमुख (हातनोली यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनातील विविध पैलू कथन करुन शिव भक्तांना मंत्र मुग्ध केले.या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले.त्याच समवेत प्रश्नमंजुषा,सांस्कृतिक, व मनोगत,व्यक्त करुन बक्षीस समारंभ अदि कार्यक्रम घेण्यांत आले.
, किल्ले ,व रांगोळी परिक्षक म्हणून कथ्थक नृत्य,फोटोग्रॉफर -राहुल जांभुळकर,रांगोळी आर्टीस्ट, फॅशन डीझायनर -रक्षा जांभुळकर,व्यवस्थापक शिल्पकला - मुकेश आपटेकर- ब्लॅक बेल्ट - महेश शिंदे,गिर्यारोहक - निखिल साळवी,हितेश कुंभार,ओंकार गुरव,स्मित गुरव,आरोग्य सामाजिक कार्यकर्ती - प्रिती आपटेकर,सौंदर्यप्रसाधन - सुकेशनी गायकवाड,क्रिडा शिक्षक - अक्षदा आपटेकर,ॲड.हर्षदा साळवी,वस्त्रभूषण कलात्मक रचनाकार - अंकिता गुरव,मेघनाथ कुंभार,या कार्यक्राचे शिव कालीन खेळ सौजन्य ग्रूप ग्राम पंचायत तुपगांव सरपंच रविंद्र शेठ कुंभार यांच्या माध्यमातून करण्यांत आले.भजन सम्राट - भगवान बुवा आपटेकर,किर्तनाकर वसंत महाराज कुंभार,अदि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments