अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन

 अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन 






पातळगंगा न्युज : वृत्तसेवा 
तळवली  : १२ नोव्हेंबर,

                 रायगड जिल्हातील बोंबल्या विठोबा यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या साजगाव यात्रेस कार्तिकी एकादशी पासून प्रारंभ झाला असून तालुक्यासह जिल्हातील वारकरी संप्रदाय विठू रायाच्या चरणी लीन होण्यासाठी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले खालापूर तालुक्यातील तळवली गावातील वारक-यांनी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले.       

                                                                                                 ही पायी दिंडी अंबिवली ( माजगांव ) येथे येताच ग्रूप ग्राम पंचायत माजगांव मा.उपसरपंच सरपंच राजेश ,पाटील स्मित संकल्प व्यवस्थापक मंगेश पाटील,नितिन काठावले मोनिका जाधव,यांच्या हस्ते या दिंडीचे स्वागत समारंभ करुन अल्प आहार देण्यात आले.संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली धाकटी पंढरी येथे ते घाटमाथ्यावरून मिरची व्यापार करण्यासाठी या परिसरात येत असत.परंतू मिरची विकल्यानंतर पैसे वसूल झाले नाही.तेव्हा संत तुकाराम महाराज यांनी विठ्ठलाच्या नावाने बोंब मारल्या तेव्हा पासून या विठ्ठलास बोंबल्या विठोबा ची जत्रा असेही संबोधले केल्याची आख्यायिका आहे.                   

      यावेळी या पायी दिंडीचे आयोजन,ह.भ.प.मधुकर मालकर,अनिल मालकर,देविदास मालकर,जे.के.मालकर,महेंद्र मालकर,भरत मालकर,अनंत मालकर,संतोष मालकर,भगवान मालकर,रोहीदास मालकर,रामदास मालकर,जितेंद्र मालकर,तानाजी मालकर,पांडुरंग मालकर,बाळाराम मालकर,शशिकांत  मालकर,सुनिल मुंढे,नितिन बडेकर,जयराम मालकर,दशरथ मालकर,लक्ष्मण मालकर,सागर मालकर,तसेच शेकडो वारकरी या दिंडी मध्ये सहभागी झाले होते. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर