अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या सन २०२३ च्या पालक संघाच्या उपाध्यक्षपदी विलास श्रीखंडे यांची निवड
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
कर्जत : ४ जुलै,
रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात एक अग्रेसर अर्थात नावलौकिक असलेले शैक्षणिक संस्था म्हणून कर्जतमधील अभिनव ज्ञान मंदिर संस्थेची अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाची मोठी ख्याती आहे.शिक्षकांच्या सहकार्याने सन २०२३ च्या पालक संघाच्या अध्यक्षपदी अभिनव ज्ञान मंदिर संस्थेचे मुख्याध्यापक एस.एस. जोशी सर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. तर, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे पालक प्रतिनिधी पत्रकार विलास श्रीखंडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सन २०२३ च्या शैक्षणिक वर्षात या संस्थेत इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे एकूण साडेतीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून कनिष्ठ महाविद्यालयाच्या २० तुकड्या तर माध्यमिक ३२ तुकड्या अशा एकूण ५२ तुकड्यांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यामध्ये योग्य समन्वय असेल तरच विद्यार्थी खऱ्या अर्थाने उत्तुंग भरारी घेतील याच अनुषंगाने अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सन २०२३ साठी नियुक्त केलेल्या ५२ पालक प्रतिनिधींच्या पालक संघाची बैठक अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत येथे आयोजित करण्यात आली.
त्याप्रसंगी सर्व पालक संघाचे प्रतिनिधी व सचिव पदी बारकडे मॅडम तर, सहसचिव पदी भारती कांबळे यांची निवड झाली आहे.मंगळवार दिनांक १ ऑगस्ट रोजी दुपारी झालेल्या पालक संघाच्या बैठकीत शाळेतील समस्या, विद्यार्थी शिक्षक यामध्ये समन्वय व शाळेचे कौतुक करताना नितीन भासे, सुभाष जाधव, मेघना शेडगे, शितल सेठ, करूणा कांबळे व नरेंद्र सोमणे या पालक प्रतिनिधींनी मुलांच्या शिक्षणासंबंधी बोलताना शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यातील योग्य समन्वय,
पालकांनी मुलांवर स्वतः जबाबदाऱ्या न लादणे, जादा तास, स्पर्धा परीक्षा तयारी, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच विविध क्रीडा स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन, शिस्त, सोशल मीडियाचा होणारा अतिवापर, याचबरोबर शाळेची शिक्षण कार्यपद्धती, सर्व शिक्षकांच्या अध्यापनातील सातत्य व त्यामुळेच या शाळेतील सातत्याने वाढणारा विद्यार्थ्यांचा बौद्धिक उच्चांक ही विद्यार्थ्यांनी घेतलेली मोठी करून झेप म्हणावे लागेल अशा शब्दांत शाळा व्यवस्थापन व शिक्षकांचे भरभरून कौतुकही पालक प्रतिनिधी यांजकडून करण्यात आले.
त्याप्रसंगी अभिनव ज्ञान मंदिर संस्थेचे मुख्याध्यापक एस.एस. जोशी सर, उपमुख्याध्यापक निकम सर, उपमुख्यदापिका खडे मॅडम, देशमुख मॅडम, बारकडे मॅडम सर्व शिक्षक वृंद त्याचप्रमाणे विश्वनाथ भोशीकर, विलास देशमुख, शरद ओव्हाळ, संजय ऐनकर यांसह अनेक महिला व पुरुष पालक प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया
सध्याची स्पर्धेच्या युगातील गतिमान शिक्षण पद्धत, अगदी लहान वयातच शिक्षणाबरोबर पालकांकडून इतर क्षेत्रात मुलांना दिली जाणारी अधिकची जबाबदारी तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा शैक्षणिक स्थर वाढविण्यासाठी सातत्याने जर योग्य समन्वय असेल तर तो विद्यार्थ्यांना पुढील काळात निश्चितच दिशादर्शक ठरेल
- विलास ह. श्रीखंडे
उपाध्यक्ष, पालक संघ अभिनव ज्ञान मंदिर कर्जत
0 Comments