विजेचा शॉक लागताच,प्रसंग अवधान दाखवून तरुणांनी वाचविले वयो वृद्धाचे प्राण
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव,आंबिवली , ५ ऑगस्ट
खालापूर तालुक्यातील असलेल्या आंबिवली गावामध्ये आज रस्त्यालगत असलेल्या विजेच्या पोलाच्या बाजुला एक वयोवृद्ध काम करीत होते.मात्र हेच काम आपल्या जिवावर बेतू शकते यांची कल्पना नव्हती,मात्र काही क्षणांत ही व्यक्ती मोठ्या - मोठ्याने ओरडू लागल्यांने या रस्त्यालगत उभे असलेले सामाजिक कार्यकर्ते भगवान जाधव यांच्या निदर्शनास आले की या वयोवृद्ध व्यक्तीस विजेचा शॉक लागला आहे. त्यांनी या ठिकाणी असलेल्या युवकांना वाचविण्यासाठी सहकार्य करावयास सांगितले आणी काठीच्या साह्याने आणी तरुण वर्गांच्या हुशारीने मोठा अनर्थ टळला आणी त्यांचे प्राण वाचले.
पावसाळ्यात जमिन ओली असल्यामुळे बहुतांश विजेच्या पोलांना शॉक लागत असतो.आपल्याला शोशल मिडीयांच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात असते.मात्र याकडे आपण सातत्याने दुर्लक्ष करीत असतो.विशेष म्हणजे शाळकरी मुले या आशा अपघात सापडत असतात.म्हणून आपणांस आश्या काही घटना घडण्याआधी सुरक्षतेच्या दृष्टीकोणातून उपाय योजना करणे गरजेचे असते.मात्र संबंधित आधिकारी या कडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे अपघात घडत असतात.
आंबिवली येथिल वयो वृद्धांना विजेचा शॉक लागला ही बातमी काही क्षणांत या पंचक्रोशीत वा- यासारखी पसरली. मात्र त्याच बरोबर या तरुण वर्गांनी मोठ्या हुशारीने या वयो वृद्धाचे प्राण वाचविल्यामुळे त्यांच्या वर कौतुकांचा वर्षाव होत असल्यांचे पहावयास मिळत आहे.सदर ग्रूप ग्राम पंचायत माजगांव यांनी आश्या धोकादायक विजेच्या पोलांची संबंधित विद्युत कर्मचारी यांना बोलावून पहाणी करावी असे असे पत्र ग्रामपंचायतीला तरुण वर्ग देणार आहे असे समजते.
यावेळी या वयो वृद्धाचे प्राण वाचविण्यासाठी जिवाची बाजी लावणारे सामाजिक कार्यकर्ते - भगवान जाधव, ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सदस्य - रमेश जाधव, मा. सरपंच रुपेश म.जाधव,सतिश र.जाधव,सुरेश शेरे,संतोष कांबळे,वैभव परांगे,अनिल जाधव,नामदेव जाधव, अरुण ल.जाधव,दिक्षा जाधव अदि ने मेहनत घेवून त्यांचे प्राण वाचविले.
0 Comments