राजिप शाळा वडवळ च्या कुस्ती मध्ये विद्यार्थी प्रथम क्रमांकाच्या मानकरी

 राजिप शाळा वडवळ च्या कुस्ती मध्ये विद्यार्थी प्रथम क्रमांकाच्या मानकरी     


                  

पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा                                     वडवळ : ४ सप्टेंबर


           खोपोली येथे नुकताच विद्यार्थ्यांची कुस्ती स्पर्धा संपन्न झाली.यामध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा वडवळ येथिल विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविल्यांने शाळेचे,शिक्षक आणी पालक वर्गांचे आनंद व्यक्त करीत आहे.या आगोदर येथिल विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये आपले कौशल्य पणाला लावून यश संपादन केले होते.शिक्षणा समवेत खेळाचे कौशल्य असणे गरजेचे आहे. या बाबीचा सखोल आभ्यास करून विद्यार्थ्यांना कुस्ती चे धडे देण्यात आले होते.
                     यावेळी या कुस्ती मध्ये फक्त एकमेव रा.जि.प.वडवळ शाळेतील सहावीतील विद्यार्थ्यांचा सहभागी होते. यामध्ये १४ वर्ष वयोगट प्रथम क्रमांक  हर्ष हरिश्चंद्र कुंभार, ४४  वजनगटामध्ये प्रथम क्रमांक काव्या राजेंद्र मरागजे ,33 वजनगट,प्रथम क्रमांक  वैदिका नितीन मरागजे,30 वजन गटामध्ये या तिन्ही मुलामुलींचे १४ वर्ष वयोगटा मध्ये प्रथम क्रमांक पटकवल्याने वडवळ शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष राजेंद्र कदम तसेच संजय कदम ग्रूप ग्राम पंचायत सदस्य वडवळ तथा शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य आणि सर्व सदस्य ,ग्रामस्थांच्या  माध्यमातून कौतुकाची थाप या विद्यार्थ्यावर पडत आहे.
                तालुकास्तरीय कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याने जिल्हा स्तरावर निवड झाल्याने विद्यार्थी चेहऱ्यावर हास्य फुलले पहावयास मिळाले.तसेच त्यांनी उत्तम प्रकारे कुस्ती खेळून आपल्या शाळेचे, गावाचे नाव उज्वल करावे यासाठी सर्व शिक्षक,पालक वर्गांनी शुभेच्छा दिल्या.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर थळे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा खालापूरचे सरचिटणीस राजाराम जाधव , जेष्ठ शिक्षिका विजया शिंदे , करुणा बोंबे , हर्षा काळे  तसेच उत्तम कुस्ती खेळल्याने वस्ताद पै.संदेश मरागजे यांनीही सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.शिवाय त्यांनीही शुभेच्छा देण्यात आल्या.

  

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,