सकळ मराठा समाज चावणे विभाग दहावी ,बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

 सकळ मराठा समाज चावणे विभाग दहावी ,बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न


   पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा                                    चावणे : ४ सप्टेंबर,






               शाळेय शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांना परिक्षा ही मोठी कसोटी असते.वर्षभर केलेला आभ्यासामुळे अनेक विद्यार्थी उत्तम यश संपादन करीत असतात.मात्र हे यश त्यांस सहजासहजी मिळालेले नसते यासाठी त्यांनी डोळ्यात तेळ घालून अनेक तास आभ्यास करून उत्तम गुण प्राप्त केलेले असतात.त्यांनी घेतलेली मेहनत इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरावी यासाठी दहावी,बारावी उत्तम यश संपादन केल्यामुळे सत्कार समारंभ सकळ मराठा समाज चावणे विभाग यांच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी ८७ विद्यार्थ्यांना सन्मानपत्र,नोट बुक देण्यात आले.


                  गेले अनेक दिवस शिक्षकांची भेटी घेवून या शाळेमध्ये कोणता विद्यार्थी प्रथम ,द्वितीय आले किंवा उत्तम गुणांनी किती पास झाले यांची माहिती जाणून घेत होते.यावेळी शिक्षकांना सुद्धा या कार्यक्रमाची रुपरेषा सांगण्यात आली.विद्यार्थ्यांचा सत्कार होत ही शिक्षक आणी पालकांसाठी मोठी आनंदाचे क्षण निर्माण झाल्यांचे पहावयास मिळाले.जे विद्यार्थी आभ्यास करीत नाही.त्यांस या सत्कारांचे मुल्य समजल्यामुळे आपण सुद्धा आभ्यास करुन यश संपादन केल्यावर सत्कार समारंभ मिळवू शकतो ही भावना त्यांच्या मध्ये निर्माण झाल्यांची पहावयास मिळाली.
             




चावणे परिसरातील ८७ विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणी नोट बुक देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवून गौरवण्यात आले.यावेळी स्वराज्य संघटना राज्य समन्वयक विनोद साबळे,सरपंच -रिया कोंडीलकर ,भारती चितळे,उपसरपंच - प्रमिला यो.पाटील,मुकेश पाटील,यशश्री मुरकुटे,मिनल ठोंबरे,नलिनी करंदे, मधुरी चितळे,संतोष म्हात्रे,ग्रामस्थ -अध्यक्ष महादेव कचरे,सेक्टरी - योगेश पाटील,मोरे महाराज,वामन पाटील चंद्रकांत पाटील गणेश भोईर गणेश पवार एकनाथ म्हात्रे,हरिदास पाटील विजय मुरकुटे,शिवाजी माळी,कैलास पवार अदि च्या उपस्थित विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. 

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,