पातळगंगा एमआयडीसी प्रशासनाचं दुर्लक्ष,खड्डे भरण्यासाठी वापरले पेव्हर ब्लॉक उखडले

 पातळगंगा एमआयडीसी प्रशासनाचं दुर्लक्ष,खड्डे भरण्यासाठी वापरले पेव्हर ब्लॉक उखडले




पाताळगंगा न्यूज :  ,दीपक जगताप,देवा पवार
खालापूर : १३ नोव्हेंबर,

                पाताळगंगा परिसरात अनेक कारखाने असून,या कारखाने वहानांची रेल चेल सातत्याने असल्यामुळे या ठिकाणी कॉक्रिटिकरण करण्यात आले होते,मात्र काही ठिकाणी खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. मात्र वहानांची वर्दळ मोठ्याप्रमाणावर असल्यामुळे पेव्हर ब्लॉक विखुरले गेले असून अपघातांची समस्या गंभीर बनत आहे.
                या मार्गावर मागील तीन आठवड्यामध्ये अपघात होत असून काहींना गंभीर दुखापत झाली असून काहींना आपले प्राण गमवावे लागले आहे. रस्ता खराब झाला की  या कडे दुर्लक्ष केले जाते.काही वेळा आपली वेळ काढावी यासाठी खड्डे किंवा पेव्हर ब्लॉक सारखा वापर करुन खड्डे भरले जाते परिणामी हेच खड्डे अपघातांचे केंद्रबिंदू बनत आहे.
                  दिवाळी काही दिवसात संपेल मात्र या रस्त्यावरील पडलेले खड्डे मात्र जैसे थे अशिच स्थिती या ठिकाणी पहावयांस मिळत आहे.मात्र असे असले तरी सुद्धा एमआयडीसी प्रशासन या कडे पाठ फिरवत आहे. पाताळगंगा परिसरात शिप्ला  कॉर्नर कैरा कॉर्नर समोरील रस्त्यांमध्ये फ्लेवर ब्लॉक निघून खड्डे पडले आहेत  रस्त्यांच्या खड्ड्यामुळे एक्सीडेंटचे प्रमाण जास्त वाढले असून एमआयडीसी प्रशासन याच्याकडे
 दुर्लक्ष करत आहे. यामुळे वहान चालकांस जिव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी ही समस्या अधिक गंभीर बनत आहे.

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन